Bigg Boss 16 : शिवबद्दल चुकीचे बोलणे अर्चनाला भोवणार का

Bigg Boss 16 च्या खेळात आता खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे. घरात असलेला आपला माणूस अर्थात शिव ठाकरे ( Shiv Thakre) प्रेक्षकांच्याच नाही तर घरातील स्पर्धकांच्याही आवडीचा होऊ लागला आहे. कोणताही ड्रामा न करता तो जसा आहे तसाच या घरात आहे त्यामुळेच त्याला प्रेक्षकांचे अधिकाधिक प्रेम मिळताना दिसत आहे. पण असे असताना घरातील एक सदस्य अर्चना गौतम ( Archana Gautam) हिने मात्र त्याला सतत टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अगदी हल्लीच्या राशन टास्कमध्ये या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पण यावेळी पुन्हा एकदा अर्चना गौतम चुकली आहे. कारण तिच्याकडून अपशब्दाचा वापर करण्यात आला आहे. आता तरी तिला याची शिक्षा मिळायला हवी अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटताना दिसत आहे. 

काय घडले दोघांमध्ये

Bigg Bossच्या घरात राशन मिळवणे हे सोपे काम नाही. तुमच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्हाला टास्क खेळून त्याची भरपाई करावी लागते. घरात नुकताच एक राशन टास्क झाला ज्यामध्ये सगळे स्पर्धक गार्डनमध्ये ट्राली घेऊन फिरत होते. यात एक आवाज आल्यानंतर ट्रॉली घेऊन स्पर्धकाला धावत पहिले जायचे होते. यामध्ये पहिला मान शालिन भनौत (Shaleen Bhanot) ला मिळाला. या टास्कमध्ये ट्विस्ट असा होता की, जी राशी स्पर्धकांनी घालवली होती. ती मिळवण्याची संधी यात होती. 10 लाखाची राशी वाचवताना स्पर्धकांना नाकी नऊ येणार होते कारण सगळ्या गोष्टी या महाग होत्या. त्यामुळे सरसकट जाऊन शॉपिंग करणे हा टास्क नव्हता.  या खेळात शालिनने चिकन, दूध अशा गोष्टी घेतल्या. तर शिवला या टास्कमध्ये दोनदा विजय मिळाला त्याने घराचा विचार करुन काही वस्तूंची खरेदी केली. त्यानंतर सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) ला संधी मिळाली. ती वीगन असल्यामुळे तिला काही गोष्टी घेताना फार विचार करावा लागत होता. ज्यावेळी तिने घरातील इतरांसाठी काही गोष्टी घ्यायला सुरुवात केली त्यावेळी तिला Bigg Boss ने अडवले. त्यामुळेच अर्चनाने शिववर राग काढायला सुरुवात केली. शिवने तिला खेळण्याचा सल्ला दिला. पण अर्चना पुन्हा एकदा तिच्या खऱ्या रुपात म्हणजे तोंडाला येईल ते बोलत सुटली. त्यामुळे झाले असे की, पुन्हा एकदा घरात अर्चना एकटी पडणार आहे. ती शिवला जे काही बोलली ते सगळे बीप करुन दाखवण्यात आले. याचाच अर्थ जे शब्द टीव्हीवर दाखवू शकणार नाहीत असेच आहेत. यात काहीही शंका नाही. त्यामुळे आता यावरुन तिला काय ओरडा पडेल हे पाहणे महत्वाचे आहे.

खरी घौडदोड होणार सुरु

अर्चनाने या घरात अनेक प्रकारे चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. भांडण हा तिचा असा फंडा आहे ज्यामुळे तिला जास्तीत जास्त लाईमलाईट मिळते हे तिच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे ती अनेकदा भांडण करताना दिसते. एखादे भांडण करुन चुकीचे बोलून ती चुकी समोरच्यावर अगदी चांगली ढकलते. शिवसोबत तिने आधीही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. पण शिव रेसमध्ये आहे हे पाहून ती शिवला अधिक टार्गेट करताना दिसते. 

आता तुम्हाला या बद्दल काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा. 

Leave a Comment