Bigg Boss 16: गौतम सिंह वीजची एक्झिट?,सोशल मीडियावर चर्चा

 Mc स्टॅन आणि शालिनचा राडा घरात ताजा असताना आता सगळ्या सोशल मीडियावर एविक्शनच्या चर्चेने जोर धरला आहे. या आठवड्यात घरातून गौतम सिंह वीजची (Gautam Singh Vij) एक्झिट झाल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. बिग बॉसशी संबधित सगळ्या पेजेसने या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. घरातील गौतमचा वावर पाहता हे एविक्शन योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गौतमच्या जाण्याने फारसा फरक पडेल असे काही वाटत नाही. दरम्यान, आता या खेळात खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्रीची गरज आहे असे दिसत आहे. काय घडणार आजच्या वीकेंडच्या वारमध्ये चला घेऊया जाणून

चुकीच्या ग्रुपमुळे बसला फटका 

बिग बॉसच्या खेळात योग्य गट निवडणे हे नेहमीच फायद्याचे ठरते. जो योग्य खेळ आणि योग्य गोष्टीमध्ये बाजू घेतो त्याला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळते. आता हा खेळ इतका पुढे गेला आहे की, चांगला आणि वाईट असा गट आधीच दिसू लागला आहे. गौतम घरात आला त्यावेळी त्याची अशी एक बाजू चांगलीच दिसून आली होती. तो चांगला खेळत ही होता. पण काही आठवड्यापासून त्याच्या खेळाचा लव्ह एँगल झाल्यामुळे तो सौंदर्यापलीकडे घरात फारसा दिसत नाही. त्याची भांडण ही सौंदर्यापुरतीच मर्यादित राहिली होती. त्यामुळे त्याची प्रसिद्धी खूपच कमी झालेली होती. त्यामुळेच त्याला या आठवड्यात फटका बसणे अगदी स्वाभाविक होते. पण गौतम या घरातून योग्यवेळी बाहेर पडत असल्याचे देखील सांगितले जात आहे.  

सुम्बुलची पुन्हा एकदा कानउघडणी

खरंतरं बिग बॉस अनेक जण पाहतात सलमान खानच्या खास टिप्पणीसाठी. घरात आता असा काही प्रकार झाला आहे ज्यामध्ये सलमान खान कोणाची बाजू घेतो हे जाणून घेणे फार गरजेचे असते. स्टॅन आणि शालिनमध्ये झालेला वाद त्यामध्ये सुम्बुलचे मध्येमध्ये करणे हे कोणालाच पटले नव्हते. सलमाननेही त्याचबद्दल सुम्बुलला पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पण यावेळी त्याचा आवाज अधिक चढलेला दिसत आहे. टिना, शालिन आणि स्टॅन यांच्यामध्ये हा वाद सुरु असताना सुम्बुलने येऊन शालिनला मिठी मारणे, त्याला सतत सांगत राहणे यामध्ये तिचे शालिनवर असलेले एकतर्फी प्रेम दिसले. ज्याचा उल्लेख सलमान खानने देखील केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ हा देखील व्हायरल होताना दिसत आहे.  

शिवची बाजूही जमेची

घरात स्टॅन आणि शालिनची भांडण झाल्यानंतर ही भांडण इतकी पुढे गेली की, स्टॅन शालिनवर धावून आलेला दिसला. त्याला आवरण्याचे काम शिव (shiv Thakare) ने उत्तम प्रकारे केले. शिवने मित्र म्हणून स्टॅनला थांबवण्याचा चांगला प्रयत्न केला असे करताना त्याने शालिनला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने काही हातवारे केले याचा फायदा प्रियांका- अंकितने घेऊन शिव चुकीचा कसा हे सांगण्याचा प्रयत्न केला. या भांडणात शिव नसतानाही शिवला खेळातून काढून टाका असा एक पिल्लू सोडून तिने शिवची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जो सगळ्यांनी पाहिला. 

आता अगदी थोड्याच तासात नेमके काय घडणार ते कळेलच

Leave a Comment