लावणी क्वीन गौतमी पाटीलं लवकरच दिसणार चित्रपटात

अल्पावधीत लावणीमुळे घराघरात पोहोचलेली गौतमी पाटील कोणाला माहीत नसेल असे अजिबात नसेल. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसत आहे. आता हीच लावणीक्वीन गौतमी पाटील (Gautami Patil) आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गौतमी पाटील चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा झाली होती. आता हा चित्रपट पूर्ण पणे तयार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचे शुटिंग देशातच नाही तर परदेशातही झाले आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाविषयी आणि गौतमी पाटील विषयी अधिक 

गौतमी पाटील दिसणार या चित्रपटात

गौतमी पाटील ‘घुंगरु’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘घुंगरु’ या चित्रपटावरुन हा चित्रपट नक्कीच लावणीशी निगडीत असण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण व्हायला आले आहे असेही कळत आहे. या चित्रपटाचे लेखन बाबा गायकवाड यांनी केले आहे.कलावंताच्या जीवनाशी निगडीत असा हा चित्रपट असणार असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत लेखक बाबा गायकवाड दिसणार आहेत. ज्यांनी ‘काळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत काम केले आहे. या शिवाय या चित्रपटात शीतल गीते, सुदाम केंद्रे, उषा चव्हाण हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे शुटिंग हंपी, सोलापूर, माढा, थायलंड या ठिकाणीही करण्यात आले आहे. गौतमी पाटील हिचा हा पहिला चित्रपट असून या चित्रपटासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. 

गौतमी पाटील आली चर्चेत

गौतमीचा डान्स कितीही चांगला असला तरी देखील तिच्या नृत्याविष्कारामधून अनेकदा अश्लील चाळे होत असल्याचा आरोप होत होता. एखादी लोककला सादर करत असताना ती कला सादर करणे गरजेचे असते पण गौतमीकडून प्रेक्षकांच्या मनात अधिक घर करण्यासाठी म्हणून ती जे काही करत होती. त्यामुळे खूप जणांच्या भावना दुखावल्या होत्या. तिला बोलावून या संदर्भातील समज देखील तिला काही सेवाभावी संस्थांकडून देण्यात आला होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या आताच्या काही व्हिडिओमधून अशाप्रकारची कोणतीही अश्लीलता नसते असे देखील तिने सांगितले. तिने जाहीर माफी मागितल्यानंतर ती आता पुन्हा डान्सचे शो करताना दिसत आहे. 

त्या घटनेनंतर झाली ट्रोल

सोशल मीडियावर एखादी व्यक्ती चालली की,ती इतकी चालते की, एका दिवसात स्टार बनते. गौतमी पाटील तिच्या सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. ती प्रसिद्ध होण्याआधीपासून व्हिडिओ पोस्ट करत असते. या आधी ती टिकटॉक आणि काही व्हिडिओज पोस्ट करायची. पण तिच्या लावणीच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती एका रात्रीत स्टार झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही. पण तिचे काही डान्स जे वायरल झाले त्याममध्ये तिने जो काही अश्लील डान्स केल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोलही करायला सुरुवात केली. आजही तिच्या पोस्टमध्ये अशा काही कमेंट दिसतात. ज्यामुळे ती आजही ट्रोल होताना दिसत आहे. 

आता गौतमीच्या चाहत्यांना जर तिच्या चित्रपटाची प्रतिक्षा असेल तर थोडावेळा वाट पाहावी लागेल.

Leave a Comment