New Year नव्या वर्षाची सुरुवात करा नव्या विचाराने या गोष्टी टाळा

 नवीन वर्षात अगदी काहीच दिवसात आपण पदार्पण करणार आहोत. सरत्या वर्षातील वाईट घटना सोडून आपल्याला पुढे जाणे भागच असते. अनेक जण नवीन वर्ष सुरु होण्याआधी आपल्या चुकांची एक यादी करतात आणि पुढच्या वर्षी म्हणजेच ( New year) नव्या वर्षात या चुका करायच्या नाही असे ठरवतात. तुमच्याही आयुष्यात असे काही घडले असेल ज्याने तुम्ही सरत्या वर्षात अनेक चुका केल्या असतील असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टी टाळून नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे. कोणत्या गोष्टी या नव्या वर्षात पदार्पण करताना तुम्ही टाळायला हव्यात. Happy new year शुभेच्छा द्यायला विसरु नका.  चला घेऊया जाणून

भांडण विसरा

संवादाने भांडण टाळा

कधी कधी आपली कोणतीही चूक नसताना एखाद्यासोबत आपले खटके उडाले की, काही काळ मनाला त्याची सल लागत राहते. आपल्यासोबत असे का झाले ? या विचारात खूप जण आपला वेळ घालवतात. या भांडणामुळे मनात निरनिराळे विचार येऊ लागतात. सगळ्यांबद्दलची आपली मत बदलू लागतात. पण त्याचा तुमच्या मनावर आणि मानसिकतेवर खोलवर परिणाम होत असतो. अशावेळी तुम्ही जर ही भांडण विसरुन पुढे निघणेच चांगले असते. जर ते विसरायला होत नसेल तर नव्या वर्षात तुम्ही काही नव्या गोष्टी करायला घ्या किंवा झालेले भांडण सोडवायचा किंवा मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा.

स्वत:ला कमी समजणे टाळा

सरत्या वर्षात जर तुम्हाला असा अनुभव आला असेल की, तुम्ही मेहनत करताय पण तुम्हाला त्यातून कोणतेही यश मिळत नाही. पण नव्या वर्षात तुम्ही नव्या दम्याने याची सुरुवात करणार आहात हा एकच विचारमनात ठेवा. नवीन वर्षात मला हे जमेल की नाही? माझे चांगले होईल की नाही? याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करु शकता हे डोक्यात ठेवून पुढच्या वर्षाचे स्वागत करा. नकारात्मक विचार काढून टाका आणि सकारात्मक उर्जेने स्वत:ला भरा

वाईट घटनांची आठवण टाळा

वाईट आठवणी टाळा

वर्षाचे 365 दिवस सगळ्यांसाठीच चांगले असतात असे नाही. आपल्याला अनेक चढ- उतार या काळात पाहावे लागतात. या काळात जर एखादी वाईट घटना आपल्यासोबत घडली असेल तर ती घटना आपल्याला बऱ्याच काळासाठी दु:खाच्या गर्तेत ढकलते. त्यातून बाहेर येण्यासाठी बराच काळ जातो. आपल्या जवळची व्यक्ती जाणे, एखादे मोठे नुकसान होणे यामुळे आयुष्याची घडी काही काळासाठी नक्कीच बिघडते. पण त्या वाईट घटनांची आठवण आपल्याला पुढे जाऊ देत नाही. या नव्या वर्षात या वाईट आठवणी मनातून काढून टाका आणि पुढे व्हा. अस केले नाही तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून भरकट जाल.

चुका टाळा

मनुष्य म्हटल्यावर चुका या होणारच. कोणीही या जगात परफेक्ट नाही.  प्रत्येक माणूस कधी ना कधी चुकतो. एखादी चूक आपल्याकडना घडली हे जर तुम्हाला लक्षात आले असेल तर त्या चुका तुमच्याकडून भविष्यात होणार नाही याची काळजी घ्या. या चुकांची यादी आताच करा. नव्या वर्षात या चुका होणार नाही याची काळजी घ्या. 

नव्या वर्षाचे स्वागत करण्याआधी तुम्हीया गोष्टी नक्की टाळा. तुमचे नवे वर्ष चांगलेच जाईल. 

Leave a Comment