कर्करोगाचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम, तज्ज्ञांचे मत

स्त्रीरोगविषयक कर्करोगाचा प्रजनन अवयव आणि जननक्षमतेशी संबंधित ग्रंथींवर परिणाम करू शकतात. स्त्रीरोगविषयक कर्करोग स्त्रीच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये किंवा गुप्तांगांमध्ये देखील होतात. कर्करोग योनीमीर्ग, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयांवर प्रभाव करतात. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हे लैंगिक संक्रमण, मानवी पॅपिलोमाव्हायरस किंवा एचपीव्हीमुळे होते. डॉ. प्रिथीका शेट्टी, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी यांच्याकडून आम्ही अधिक माहिती घेतली.

महिलांनी विलंब करू नये 

गर्भाशयाच्या अस्तरावरील पेशी खूप झपाट्याने वाढतात आणि गर्भाशयाची भिंत किंवा पोकळीत पसरतात तेव्हा एंडोमेट्रियल कर्करोग होतो. गर्भाशयाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार एंडोमेट्रियल कार्सिनोमा म्हणून ओळखला जातो. कर्करोगशरीराच्या निरोगी ऊतींवर आक्रमण करून त्यांचा नाश करू शकतात. हल्ली करिअर तसेच इतर कारणांमुळे गर्भधारेस उशीर होतो. स्त्रीरोगविषयक कर्करोग सामान्यतः प्रौढ वयोगटात दिसून येतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रारंभिक अवस्थेतील कर्करोग आहे जो 30 ते 40 वर्षे वयोगटात दिसू शकतो. स्त्रीरोगविषयक कर्करोग असलेल्या महिलांनी विलंब न करता वेळेवर हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. कर्करोगाच्या टप्प्यानुसार प्रत्येक कर्करोगाची लक्षणे आणि उपचार पध्दती वेगवेगळ्या असतात. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा अगदी शस्त्रक्रिया हे कर्करोगावरील सर्वात सामान्य उपचार पर्याय आहेत. कर्करोगाच्या उपचारांमुळे पुनरुत्पादनात गुंतलेल्या अंडाशय, फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय आणि गर्भाशय ग्रीवेचे नुकसान होऊ शकते.

प्रजनन क्षमतेवर परिणाम

प्रजननक्षम वयात स्त्रीरोगविषयक कर्करोगाच्या उपचारामुळे तिच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे अंडाशय, गर्भाशय ग्रीवा आणि एंडोमेट्रियल कर्करोगाचा सामना करण्यास मदत करू शकतात. शिवाय या कर्करोगांच्या निदानामुळे रुग्णांचे लैंगिक कार्य आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. प्रजनन क्षमता कमी होणे अनेकदा त्रासदायक ठरु शकते आणि एखाद्याच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. अशाप्रकारे, स्त्रीरोगविषयक कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता टिकवून ठेवणे आवश्यक आहे कारण केमोथेरपी अंडाशयाच्या कूपांचा नाश करू शकते तसेच अंड्यांच्या परिपक्वता प्रक्रियेत अडथळा आणू शकते परिणामी अंड्यांचा दर्जा कमी होतो. केमोथेरपीचा अंडाशयांवर परिणाम होतो आणि ते अंडी किंवा इस्ट्रोजेन सोडणे थांबवू शकतात आणि याला प्रायमरी ओव्हेरीयन इनसफिशियन्सी (POI) म्हणून ओळखले जाऊ शकते. ही स्थिती अल्प कालावधीसाठी असेल आणि त्यानंतर मासिक पाळी नियमित होईल आणि उपचारानंतर प्रजनन क्षमता पुनर्संचयित केली जाऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, अंडाशयांचे नुकसान अपरिवर्तनीय आहे आणि कायमस्वरूपी वंध्यत्व येऊ शकते

Leave a Comment