फॉलिक्युलर स्टडी (Follicular Study) हा स्त्रियांमध्ये केलेला अभ्यास एखाद्या स्त्रीचे ओव्हुलेशन (Ovulation) होत आहे की नाही हे सांगते. ओव्हरी ही फॉलिकलने भरलेली पिशवी आहे . प्रत्यक्षात फॉलिक्युलर अभ्यास हा गर्भधारणेशा संबंधित असतो. स्त्रीच्या मासिक पाळीच्या सुरुवातीस अनेक फॉलिकल्स विकसित होऊ लागतात. एक स्त्री सुमारे 4 लाख फॉलिकल्ससह जन्माला येते. या 4 लाख फॉलिकल्सपैकी प्रत्येक महिन्यात एक अंडे बीजकोशातून सोडले जाते. हा अभ्यास करण्यासाठी काही साधे अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जातात. ही चाचणी स्त्रीच्या मासिक पाळीची सद्यस्थिती जाणून घेण्यास मदत करते. तसेच गर्भाशयाच्या अस्तराची जाडी दर्शवते. डॉ. करिश्मा डाफळे, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले.
ओव्ह्युलेशन प्रक्रिया कशी असते? (About Ovulation Process)

ओव्ह्युलेशन हा स्त्रीच्या शरीरातल्या प्रजननाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्या वेळी अंडाशयातून (Ovary) बीजांड (Egg) बाहेर पडून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं. पुरुषाच्या वीर्यातून(semen) आलेल्या शुक्राणूकडून (Sperm) त्या बीजांडाचं फलन होतं, तेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये भ्रूण तयार होतो. नंतर तो ग्रभाशयात जाऊन गर्भ म्हणून विकसित होत जातो. शुक्राणूंकडून बीजांडं फलित केलं गेलं नाही, तर अशी अफलित बीजांडं नंतर मासिक पाळीच्या वेळी होणऱ्या रक्तस्रावातून बाहेर पडतात.
फॉलिक्युलर अभ्यास का केला जातो?
ओव्ह्युलेशन दरम्यान स्त्रीमध्ये किती अंडी असतात. ते पूर्णपणे मॅच्युअर आहेत की नाही हे देखील या अभ्यासाच्या माध्यमातून दिसून येते. या टप्प्यावर हार्मोन्स खूप महत्त्वाचे असतात. जर तुमची संप्रेरक पातळी योग्य नसेल तर तुम्हाला गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकतात. ज्यासाठी डॉक्टरांकडून काही औषधं दिली जातात.
फॉलिक्युलर टप्पा
हा एक प्रारंभिक कालावधी आहे, जो तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. जेव्हा ओव्हुलेशन सुरू होते तेव्हा हा टप्पा संपतो.यात मॅच्युअर फॉलिकल आणि त्यांची संख्या दिसून येते.
ओव्ह्युलेशन टप्पा
अंडाशय जेव्हा फलोपियन ट्यूबच्या खाली परिपक्व अंडी सोडते तेव्हा ओव्हुलेशन होते. हे चक्र केवळ 24 तास चालते.
ल्यूटल टप्पा
फॉलिकलमध्ये हार्मोन्स तयार होतात ज्याद्वारे अंडी बाहेर पडतात. जे स्त्रीच्या गर्भाशयाला जाड आणि मजबूत बनवण्याचे काम करते. जेणेकरून ती गर्भधारणेची तयारी करू शकेल. जर तुम्ही बर्याच काळापासून गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमचे फॉलिक्युलर आणि ल्यूटियल टप्प्यातील लांबी किती आणि तुमची मासिक पाळी (Monthly Cycle) कधी येते हे जाणून घेण्यास मदत करू शकते. हे खूप महत्वाचे आहे कारण या टप्प्यांमुळे कुठल्याही टप्प्यात दोष असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधौपचार करता येते.
फॉलिक्युलर स्टडी अल्ट्रासाऊंडचे फायदे कोणते?

- गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते
- अंडी योग्यरित्या विकसित होत आहेत की नाही हे पाहता येते
- ही चाचणी वेदनारहित आहे, त्यामुळे इतर वेदनादायक चाचण्यांपासून दूर राहता येऊ शकते
- ज्या स्त्रिया बऱ्याच काळापासून आई होऊ शकत नाहीत त्यांना गर्भवती होण्यास मदत करते
ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत असतील नक्की काय करायला हवे आणि कोणते टप्पे आहेत हे जाणून घ्या.
Period Smell: मासिक पाळीत येत असेल अधिक दुर्गंध तर टाळा या चुका
विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण, सणासुदीच्या काळात चिंतेचे वातावरण
मांड्याना मांड्या घासतात, हे उपाय देतील आराम | Thigh Chafing