दाद्या आणि इक्यामध्ये बिनसलं; याला अपूर्वा जबाबदार?

बिग बॉसचं घर म्हटलं की ड्रामा, भांडणं, माऱ्यामाऱ्या या गोष्टी आल्याच. इथे कधी आपला शत्रू आपला चांगला मित्र बनतो, तर कधी आपली जवळचीच माणसं आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. काहीसं असंच झालंय विकास सावंत आणि किरण माने या दोन स्पर्धकांच्या बाबतीत. एकमेकांचे जिगरी दोस्त म्हणवणाऱ्या या दोघांमध्ये दुरावा आला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया.

गद्दार कोण?

कलर्स मराठी वाहिनीवरील (Colors Marathi) बिग बॉस मराठीचा (Bigg boss Marathi) चवथा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. सध्या घरामध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. नुकत्याच झालेल्या ‘गद्दार कोण’ या टास्क दरम्यान विकास सावंतने (Vikas Sawant) त्याचा जिगरी दाद्या किरण माने (Kiran Mane) याला गद्दार करार दिला. त्यामुळे किरण माने चांगलाच दुखावला आणि त्याला अश्रू अनावर झाले. आता काहीजण याला किरणचा दिखावा म्हणत आहेत तर काही किरणची बाजू घेत विकासला दोषी ठरवत आहेत. 

तर झालं असं की, रविवारी झालेल्या ‘गद्दार कोण’ या टास्कमध्ये, महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) प्रत्येक स्पर्धकाला दुसरा कोणता स्पर्धक गद्दार वाटतो आणि का? हे सांगून त्या स्पर्धकाला गद्दार असं लिहिलेला बॅच लावायचा असं सांगितलं. या खेळात एक ट्विस्ट असा होता की दोन मित्रांमध्येच हा टास्क झाला पाहिजे, कारण जो मित्र असतो तोच गद्दार निघतो..त्यामुळे त्यानुसारच निवड करा… असं माजरेकरांनी स्पर्धकांना सांगितलं. ज्यावेळी विकासची पाळी आली तेव्हा त्याने किरण मानेला गद्दार घोषित केले. आता त्याने असे का केले याचे स्पष्टीकरण जरी विकासने दिले असले तरी ते कारण फारसे कुणाला पटले नसल्याचे मत, सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. 

तर काहीजणांनी, ‘विकास सावंतला मुळातच टास्क कळला नाही आणि फक्त मित्रापैकीच एकाची निवड करायची म्हणून त्याने किरणला निवडले’.. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवल्या आहेत. आता यातील नक्की काय खरं आणि काय खोटं हे विकास सावंतच जाणे!

अपूर्वा नेमळेकर याला जबाबदार?

दरम्यान, ‘’विकास आणि किरणमध्ये ही जी फूट पडलीये त्याला अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) जबाबदार आहे, तिच किरण विरुद्ध विकासचे कान भरत असते, त्याला किरण विरुद्ध खेळण्यासाठी उकसवत असते..आणि  तिच्याच इनफ्ल्युअन्समुळे किरणनने हा मूर्खपणा केला…’’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि संताप नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत. 

रविवारचा एपिसोड संपल्यानंतर शेवटी ज्यावेळी पुढील भागाचे हायलाईट्स दाखवण्यात आले, त्यामध्ये किरण माने खूप नाराज असल्याचं आणि विकास त्याला समजावत असल्याचं, त्याची माफी मागत असल्याचं दिसून आलं. या क्लिपमध्ये किरण विकासला स्पष्ट म्हणताना दिसला, की ‘’इक्या माझी समजूत काढू नको, त्यापेक्षा जा तूझ्या अपूर्वा ताईजवळ बस…जे लोक माझ्या विरुद्ध बोलत आहेत, तुला भडकवत आहेत..तू त्यांच्यात जाऊन बस…!’’ 

त्यामुळे बहुधा प्रेक्षकांप्रमाणेच किरणलाही वाटत असावे की त्याच्या आणि विकासमध्ये फूट पाडण्यात अपूर्वा नेमळेकर यशस्वी झाली आहे. आता या सगळ्यावर अपूर्वाचं काय म्हणणं आहे हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेलच. मात्र विकास आणि किरणमध्ये आलेल्या या दुराव्यामुळे या जोडीचे चाहते दुखावले असणार हे मात्र नक्की. आता पाहूया, हा दुरावा किती काळ टिकतोय ते…

Leave a Comment