Bigg Boss Marathi : पहिला सदस्य घरातून बेघर, निखिल राजेशिर्केला कमी मतांचा फटका

Bigg Boss Marathi सीझन 4 च्या घरातून पहिला सदस्य बेघर झाला आहे. हा सदस्य आहे अभिनेता निखिल राजेशिर्के. पहिल्याच आठवड्यात घरातून कोण बाहेर पडेल? याची चर्चा होत असताना निखिलचे नाव घेणे हे काही आश्यचर्य वाटेल असे अजिबात नव्हते.निखिलसोबत बॉटम 4 मध्ये अमृता धोंगडे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे हे होते. यातील निखिल राजेशिर्केला कमी मतांचा फटका बसला. त्यामुळे त्याला पहिल्याच आठवड्यात राम राम ठोकावा लागला. जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात रविवारी काय घडलं या विषयी 

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

निखिल राजेशिर्केला खेळच कळला नाही

 Bigg Boss हा रिॲलिटी शो आल्या दिवसापासून खेळण्यासारखा आहे. या खेळात तुम्ही थांबलात तर संपलात असे असते. जो स्पर्धक पहिल्या दिवसापासून आपली छबी दाखवतो. तो स्पर्धक हमखास शेवटपर्यंत टिकतो किंवा नाव करुन जातो हा या खेळाचा इतिहास आहे. निखिल राजेशिर्के या घरात आला पण तो या घरात फारसा फिट वाटला नाही. तो कोणत्याही चर्चांमध्ये दिसून आला नाही किंवा खेळ जिंकण्यासाठी आलेली जिद्द तशी काही त्याच्यात फारशी दिसलीच नाही. कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रसाद आणि त्याच्यात झालेल्या भांडणाला सोडले तर त्याची घरात मत अशी काही दिसली नाहीत. याचाच फटका निखिलच्या मतांमध्ये झाला असावा असे दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी निखिलला खेळ कळलाच नाही अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Bigg Boss मराठी | गटबाजीच्या आड काही स्पर्धकांचा होतोय फायदा

अपूर्वाचा उद्धटपणा

मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो. पण बिग बॉससारख्या रिॲलिटी शोमध्ये असताना तुम्हाला कधी कधी नमत देखील घ्यावं लागतं.  पण अपूर्वा नेमळेकर असे काहीच करताना दिसत नाही. वीकेंडची चावडी ही स्पर्धकांची कानउघडणी करण्यासाठी असते. महेश मांजरेकर स्पर्धकांना चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी सांगतात. अपूर्वा नेमळेकर आल्यादिवसापासून या घरात थोडा उद्धटपणा करताना दिसतेय. तिच्या संदर्भात महेश मांजरेकरांनी काही मत मांडल्यानंतर त्यांची मत खोडून काढताना देखील ती दिसली आहे. त्यामुळे आपलं ते खरं करण्याची तिची सवय काही केल्या कमी होईल असे दिसत नाही. 

यंदाचा सीझन रटाळ

एकूणच मराठी Bigg Boss चे सीझन पाहता हा नवा सीझन फारच रटाळ वाटत आहे. आलेले सेलिब्रिटी हे फारच मुळमुळीत खेळताना दिसत आहे. घरात एखादी भांडण झाली तर ती भांडणही अगदी आव आणून केल्यासारखी वाटतात. यशश्री मसुरकर ही कायम घरात अगदी क्षुल्लक कारणावरुन रडताना दिसते. घरात कपल म्हणून आलेले रोहित शिंदे- रुचिरा जाधव यापैकी रोहित स्वत:साठी खेळताना दिसतो. पण रुचिरा या घरात केवळ रोहितला चिअर अप करायला आल्याच्या भूमिकेत दिसते. किरण माने आल्यादिवसापासून अनेकांचा टार्गेट झाले आहेत. त्यातल्या त्यात मेघा, प्रसाद, अक्षय, समृद्धी, विकास, अपूर्वा, तेजस्विनी, अमृता धोंगडे काहीतरी करताना दिसतात. त्यांना आपली बाजू आहे असे दिसते. पण असे असले तरी हा सीझन म्हणावा तितका हॅपनिंग अजिबात वाटत नाही. 

पुढील आठवड्यात कोणता स्पर्धक खेळातून बाहेर पडेल असे तुम्हाला वाटते आम्हाला नक्की कळवा.

Bigg Boss 16 | शालीन आणि सुम्बुलची या कारणामुळे होतेय चर्चा

Leave a Comment