Bigg Boss 16 : मंडलीमधील दोन सदस्य या कारणामुळे झाले एविक्ट

Bigg Boss 16 मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. कारण आता या रिॲलिटी शोचा  उत्तरार्ध सुरु झाला आहे. अगदी 4 च आठवड्यात आपल्याला या सीझनचा विजेता कळणार आहे. या घरात मंडली नावाने ओळखला जाणारा गट अर्थात शिव (shiv thakre), साजिद, स्टॅन, निमरित, सुम्बुल, अब्दू यांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. पण एकामागोमाग एक या घरातून साजिद (sajid khan) आणि अब्दू या दोघांना काही खासगी कारणामुळे या शोमधून बाहेर जावे लागले. ज्याचा परिणाम आता या घरात मंडलीमधील चारच सदस्य घरात राहिले आहेत. आता यामधून नेमका कोण ठरतो विजेता याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक

एक्स्टेन्शनमुळे झाले नुकसान

बिग बॉस मराठी

बिग बॉस हा शो खरा 100 दिवसांचा पण आतापर्यंत अनेकदा सीझनची प्रसिद्धी बघून तो वाढवण्यात आला आहे. हा सीझनही असाच काहीसा आहे. काऱण या सीझनमध्ये असे काही चेहरे आले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. पण या शोमध्ये येण्याआधी काही ठराविक दिवसांचे कॉन्स्ट्रॅक्ट साईन करुन प्रत्येकाला यावे लागते. तो करार मोडला तर त्याचा दंडही भरावा लागतो. आता हा सीझन वाढवला म्हटल्यावर आधीच काही कामांसाठी दिलेल्या तारखांवर परिणाम होणे हे अगदी स्वाभाविक आहे. या शोमधून अब्दूला काही कामासाठी निघावे लागले आहे. तो या शोमधून स्वत:हून एलिमिनेट झाला आहे. तर दुसरीकडे साजिद खानही त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर पडला आहे. त्यामुळे या दोघांना कामाच्या अपरिहार्य कारणांमुळे बाहेर पडावे लागले आहे.

 

मंडली तुटली

या घरात प्रेक्षकांना जरा काही आवडत होते तर ती होती मंडली. कारण त्यांच्यातील खरी मैत्री ही त्यांना खेळात अधिक टिकवून धरत होती. या मंडलीतील दोन महत्वाचे सदस्य गेल्यामुळे फायदा हा दुसऱ्या गटाला नक्कीच होणार आहे. या दुसऱ्या गटात सौंदर्या, अर्चना, प्रियांका, शालिन, टिना यांचा समावेश आहे. आता यांचे संख्याबळ वाढल्यामुळे नॉमिनेशन कार्यात आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये नक्कीच दुसऱ्य गटाला फायदा घेता येणार आहे. मंडली तोडण्याचा दुसऱ्या गटाचा प्रयत्न करारामुळे का असेना आता सफल झाला आहे. 

आता खरा खेळ सुरु

घरात आता टॉप 9 स्पर्धक आहेत. ज्यामधील काही स्पर्धक आता पुढच्या आठवड्यात गळून पडतील. त्यातूनच निवडले जातील टॉप 5 स्पर्धक. साजिद आणि अब्दू गेल्यामुळे आता शिवचा खरा खेळ दिसेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. कारण खूप जणांना शिव खेळत नाही असे वाटत होते. तो खेळात साजिदला वाचवण्यासाठी अनेकदा चुकीचे निर्णय घेतो असेही अनेकांना वाटत होते. पण आता हा खेळ खऱ्या अर्थाने बदलणार आहे. आता फिनालेसाठीची लढत पाहता येणार आहे. 

दरम्यान, मंडलीतील दोन सदस्य कमी झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटते? 

Leave a Comment