Bigg Boss 16 |  मराठमोळा शिव ठाकरे बनला कॅप्टन

 जिथे तिथे सगळीकडे आपल्या भावाची हवा…. मराठमोळा शिव ठाकरे हिंदी Bigg Boss 16 मध्येही आपली जागा टिकवण्यात यशस्वी ठरत आहे. या घरातील कॅप्टन गौतम याने काही नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्याला त्याच्या पदापासून काढून टाकण्यात आले. मग काय घरात नव्या कॅप्टनचा शोध सुरु झाला. शिव ठाकरे आणि प्रियांका या दोघांमध्ये ही स्पर्धा रंगली होती. अखेर या स्पर्धेत आपला खेळ सिद्ध करत शिव ठाकरे यांनी कॅप्टन पदावर आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे आता मराठमोळा हा चेहरा Bigg Boss 16 च्या स्पर्धेत लोकांची मने जिंकतोय यात काही शंका नाही.

शिव ठाकरे झाला कॅप्टन

Bigg Boss 16 च्या घरात टास्क सुरु झाले आहेत. पण गेल्या काही सीझनच्या तुलनेत आतापर्यंत झालेले टास्क हे मुळमुळीतच वाटत आहेत. शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियांका यांच्यात रंगलेला टास्कही तसा काही खास नव्हता. त्यांना घराच्या आवारात ठोकळे लावून ठेवायचे होते. घरातील काही सदस्यांनी प्रियांका जिंकू नये या साठी टास्कमध्ये जो हलगर्जीपणा झाला त्याचा फायदा शिव ठाकरेला झाला आहे. घरात कॅप्टन झाल्या क्षणापासून शिवने कामाला जोरदार सुरुवात केली आहे. कामाची वाटणी आणि ती काम करुन घेण्यासाठी शिव सज्ज झाला आहे असे दिसून आले आहे.  त्यामुळे शिवच्या कॅप्टन्सीपासून मराठी प्रेक्षकांना जास्त अपेक्षा आहे यात काही शंका नाही. 

टीनासोबत उडतील का खटके

उतरन फेम टीना ही आल्यादिवसापासून घरात काही ना काही कारणामुळे चर्चेत असलेली दिसली आहेत. सुम्बुल आणि शालीनच्या नात्यासंदर्भात सगळ्या घरभर करण्यावरुन तिला वीकेंड का वारमध्ये सलमानने चांगलेच झापले होते. त्यानंतर अजूनही घरात त्या गोष्टी सुरु आहेत. कामांवरुन तर टीना ही कायमच काही ना काही कारणं देताना दिसून आली आहे. शिव कॅप्टन झाल्यानंतरही तिने काही काम करण्यावरुन नकार दिला. त्या आधी तिने पोळ्या गोल करता येत नाही त्यामुळे मी त्या करणार नाही असे कारण देखील दिले होते. त्यामुळे आता शिवसोबत कामावरुन तिचे खटके उडतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

शिव पडेल का भारी

शिव घरात आल्यापासून अनेकांनी त्याच्यासोबत स्पर्धा सुरु केलेली आहे. आधीच तो मराठी सीझनचा विजेता असल्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्यावर आहे. आता तर घरातील कॅप्टन झाला म्हटल्यावर त्याच्यासोबत भांडण होणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्या सगळ्यावर शिव हा भारी पडेल यात काही शंका नाही. घरात सध्या काही स्पष्ट ग्रुप दिसून येतात. त्यामध्ये शिव, स्टॅन, साजिद, गौरी, अब्दू, प्रियांका, अर्चना, मान्या, अंकित हे एकत्र दिसून येत आहे. तर गौतम, शालीन, निमरित, टीना, सुम्बुल, सौंदर्या असा एक गट दिसत आहे. या गटामध्ये अनेकदा भांडण दिसून आली आहे. पण शिवने खेळानंतर कोणाशीही दुश्मनी ठेवलेली नाही. त्यामुळेच त्याला या खेळात अधिक फायदा होताना दिसत आहे. 

दरम्यान कॅप्टन झालेल्या शिवची पुढची रणणिती काय असेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment