Bigg Boss 16 | साजिद-शालीनमध्ये कडाक्याची भांडण, कॅप्टन्सी टास्कवरुन राडा

 बिग बॉसच्या घरात नवीन कॅप्टनची निवड ही इतर स्पर्धकांसाठी सुवर्णसंधी असते. या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. घराची पहिली कॅप्टन निमरित (Nimrit) कडून म्हणावे असे चांगले काम न झाल्यामुळे तिला त्या पदावरुन काढण्यात आले आणि इतर स्पर्धकांना ती जागा घेण्याची संधी देण्यात आली. ही संधी मिळवण्यात शिव ठाकरे आणि गौतमला यश मिळाले खरे.. पण या टास्क दरम्यान जो राडा झाला त्यात साजिद – शालीनमध्ये जोरदार भांडण होताना दिसली. हा राडा इतका वाढला की, त्यामुळे घरातून कोणाला बाहेर काढले जावे याची चर्चा होऊ लागली.

शालीन आणि सुम्बुलमध्ये सुरु होतेय का लव्हस्टोरी

कॅप्टन्सी टास्क दरम्यानचा उद्धटपणा

नव्या कॅप्टन्सी टास्कची दावेदारी मिळवण्यासाठी घरात असलेली घंटा जो वाजवेल त्या दोन स्पर्धकांना ही संधी मिळणार होती. त्यानुसार बझर वाजल्यानंतर शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि गौतम हे पोहोचले आणि त्यांनी दावेदारीवर हक्क सांगितला. त्यानंतर रंगली या दोघांमध्ये स्पर्धा. या खेळासाठी त्यांना डोक्यावर एक एक टब देण्यात आला. जो जास्त काळ जास्तीत जास्त सामान घेऊन उभा राहील तो या घरचा कॅप्टन होणार होता. त्यानुसार टास्क सुरु झाला. घरात शिवच्या समर्थनार्थ आणि गौतमचा एक ग्रुप आहे. त्यानुसार दोघांना जिंकवण्यासाठी चढाओढ सुरु झाली. या दरम्यान शालीनने शिवच्या डोक्यावर वजन वाढवण्यासाठी आपली संपूर्ण बॅग आणली आणि त्याने त्यातील गोष्टी एकाचवेळी टाकल्या. असे करताना त्याने अर्चना हिला एक धक्का देखील दिला. तो धक्का अर्चनासाठी जोरात होता. असे असतानाही शालीनने तिची माफी मागितली नाही. आणि ज्यावेळी माफी मागितली त्यात माफीनामा नसल्यासारखे अनेकांना जाणवले. 

गौतम झाला कॅप्टन

टास्कची संचालक निमरित हिने शिवने नियमांचे उल्लंघन करुन त्याला टास्कमधून काढले ज्याचा परिणाम गौतम कॅप्टन झाला. या गोष्टीचा आनंद दुसऱ्या गटाला होता. शिवनेही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर तो शांत झाला. पण त्यानंतर अचानक साजिद – शालीनमध्ये काहीतरी गरमागरमी झालेली दिसली ज्यामध्ये शालीनही साजिदच्या अंगावर आला. तर साजिदने देखील तेच केले. त्यामुळे घराचे वातावरण चांगलेच तापले. शालीनला या आधीही काही बाबतीत खूप चिडताना पाहिले आहे. त्यामुळे घरातल्यांनी शालीनला आवरण्यास सांगितले. बिग बॉसने सगळे फुटेज पाहिल्यानंतर शालीनने तसे मुद्दाम केले नाही हे सांगितले. साजिदलाही समज दिली. पण असे असूनही शालीन मात्र अजूनही धक्का लागल्यासारखा दिसला. आता लोकांची मत मिळवण्यासाठी त्याने असे केले हे येत्या काळात नक्कीच कळेल. 

चिकनवरुनही तमाशा

बिग बॉसच्या घरात जेवणासाठी कायमच भांडण होत असतात. आता आता स्पर्धकांना उत्तम जेवण दिले जाते. शालीनला त्याच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 200 ग्रॅम प्रोटीनची दिवसभरात गरज आहे. त्यासाठी तो घरात आलेेले चिकनचे पाकिट कायम लपवताना किंवा इतरांपासून शेअर करण्याचे टाळताना दिसत आहे. टास्कच्या आधीही त्याची आणि अर्चनाची यावरुन भांडण झाली होती. सलमानने देखील वीकेंडच्या दिवशी प्रोटीन हे इतर पदार्थांमधून मिळू शकते असे सांगितले होते. पण तरीही त्याने चिकनवरुन घरात पुन्हा राडा घातला. 

आता या पुढे घरातलं वातावरण नेमकं कसं असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अधिक वाचा

बिग बॉस मराठीची पहिली चावडी मुळमुळीत

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

Leave a Comment