मुलांचे लसीकरण आणि पालकांची चिंता

लसीकरण हे मुलांना अनेक आजारास प्रतिबंध करण्यास मदत करते. याबाबत पालकांच्या मनात अनेक शंका असतात. या शंका दूर करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहे. डॉ. तुषार पारीख, बालरोगतज्ज्ञनवजात शिशु  व बालरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी, पुणे यांच्याकडून अधिक जाणून घेतले. 

Baby Immunization

1. पालकांच्या मनात त्यांच्या मुलाबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. पालकांना असे वाटते की त्यांचे मुल वेदना सहन करू शकत नाहीत. मात्र या एका कारणामुळे लसीकरण टाळणे चुकीचे ठरते. पालकांनी लसीकरणाचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे फायदे हे कोणत्याही साइड इफेक्ट्सपेक्षा कितीतरी जास्त आहेत आणि म्हणून पालकांनी मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चुकवू नये.

2. गंभीर, प्राणघातक रोगापासून संरक्षण मिळवून देण्याचे काम लसीकरणाच्या माध्यमातून होते. लसीकरणामुळे लस शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास उत्तेजित करण्यास मदत करतात,आणि शरीराला जलद आणि प्रभावी मार्गाने रोगाशी लढण्यास मदत करते.

3. लस मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीला संक्रमणांशी अधिक कार्यक्षमतेने लढण्यास मदत करू शकतात. विशिष्ट रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती वाढवणे. जर व्हायरस किंवा बॅक्टेरियाने भविष्यात कधीही शरीरावर आक्रमण केले तर रोगप्रतिकारक शक्ती त्वरित वाढते. लसीकरण शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रभाव निर्माण करते ज्यामुळे शरीर सक्षम होते.

4. मान्यताप्राप्त लसी विविध टप्प्यांमध्ये कठोर चाचणीतून जातात. लस एकदा सुरक्षित आढळली तरच सामान्य लोकांमध्ये वापरण्यासाठी परवाना दिला जातो.लस-प्रतिबंधात्मक रोगांमुळे प्रभावित होण्याऐवजी, सुरक्षित राहणे उत्तम राहील.दुष्परिणामांची भीती न बाळगता लसीकरणाद्वारे मुलाची प्रतिकारशक्ती वाढवणे नक्कीच फायदेशीर ठरेल.

Baby Vaccine

5. लसींमुळे मुलांमधील आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. गोवर सारख्या रोगासही लसीकरणामुळे प्रतिबंध करता येते. लस मुलांना गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवून देते जसे की पोलिओसारखे रोग, ज्यामुळे पक्षाघात होऊ शकतो, गोवर ज्यामुळे भरपूर ताप येऊन अंगावर पुरळ उठते आणि कधीकधी मेंदूला सूज येणे आणि न्यूमोनिया तसेच टिटॅनस सारख्या आजारांना आमंत्रण देते. स्नायू आकुंचन पावणे आणि श्वास घेण्यात अडचण येणे अशा अनेक समस्या नवजात बालकांना उद्भवतात.

6. आपले बाळ लसीकरणास सक्षम आहे का नाही या भीतीने अनेक पालक आपल्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक वगळतात.मात्र हे चुकीचे असून आपल्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चूकवू नका. जर एखादा डोस घण्यात विलंब होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रलंबित डोस लवकरात लवकर घेण्यात यावा.

7. गोवर, घटसर्प, पोलिओ यांसारखे आजार आजकाल दुर्मिळ झाले आहेत.गेल्या काही दशकांपासून प्रभावी लसीकरणामुळे रोग दुर्मिळ झाले आहेत.तरीही मुलांना याचा धोका असतो. या लसीकरणाच्या दुष्परिणामांबद्दल पालकांनी काळजी करू नये.

8. दुष्परिणामांबाबत शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचे निराकरण करावे. लसींचे वेळापत्रक लिहून किंवा फोनमध्ये नोंद करुन ठेवा

या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पालकांना या महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेऊन मुलांच्या बाबतीत नक्की करायला हव्यात.

Leave a Comment