‘बिग बॉस’च्या घरातून निघायची इच्छाच नाही, अमृता फडणवीस प्रेक्षकांसमोर खास अंदाजात

‘बिग बॉस मराठी’चा 4 था सीझन सध्या गाजतोय. दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी या घरात उपस्थित लावली. पण सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी इतकीच ओळख न ठेवता गायिका, बँकर अशी स्वतःची ओळख निर्माण करून अमृता फडणवीस यांनी नेहमीच लोकांमध्ये आपली लोकप्रियता जपून ठेवली आहे. पण आता बिग बॉससारख्या रियालिटी शो मध्ये हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का त्यांनी दिला आहे. केवळ प्रेक्षकांनाच नाही तर अगदी स्पर्धकांनाही सुखद धक्का बसला असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित झाला असून लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 

‘कजरा रे’ गाण्यावरही धरला ठेका 

बिग बॉसच्या घरात वेगवेगळे टास्क असतात आणि यामध्ये स्पर्धक सहभागी होत असतात. अमृता फडणवीस यांची खास उपस्थिती या आठवड्यात लाभली असून प्रसाद जवादे (Prasad Jawade) आणि अक्षय केळकर (Akshay Kelkar) यांच्यासह गाण्यावर ठेका धरायलाही अमृता फडणवीस कचरल्या नाहीत. इतकंच नाही तर ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर बाहेर जायची इच्छाच होत नाही असंही अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटल्याचं दिसून येत आहे. तर घरातील सदस्यांसाठी ‘मनिके मागे हिथे’ हे गाणं आणि इतरही गाणी गात सदस्यांचे मनोरंजनही त्यांनी केले. तर घरातील महिला स्पर्धकांसाठी ‘कुणी म्हणाले वेडी कुठली’ असे गाणे गात फिरकीही घेतली. तसंच सदस्यांनीही या गाण्याची मजा घेत अमृता फडणवीस यांच्यासह धमाल केली असल्याचे या प्रोमोवरून दिसून येत आहे. केवळ उपस्थिती न लावता सदस्यांपैकी एक होऊन अमृता फडणवीस यांनी सदस्यांसह तालही धरला.

‘लक्ष्मी आरती’ गाणे प्रदर्शित 

नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीची आरती हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. याशिवाय घरातील सदस्य अमृता फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीतून अमृता फडणवीस आता कोणकोणते नवीन खुलासे करणार आणि कोणाच्या नावाची फिरकी घेणार हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  पेशाने बँकर असूनही अमृता फडणवीस यांनी गायिका म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसंच सामाजिक कार्यात आणि अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होताना दिसतात. तसंच आपलं स्वतःचं मत त्या मांडताना दिसतात. त्यामुळे नेहमीच त्या चर्चेत असल्याचंही दिसून येतं. तर आता या आठवड्यात अमृता फडणवीसांसह स्पर्धक काय धमाल करणार आहेत, हे पाहण्यासाठी स्पर्धक उत्सुक आहेत. 

https://dazzlemarathi.com/shilpa-shinde-got-angry-on-karan-johar-and-jhalak-dikhhla-jaa-judges-video-got-viral/

Leave a Comment