प्लस साईज महिलांनी या टिप्स करा फॉलो आणि दिसा स्टायलिश

(How to Look Stylish in Marathi) प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. त्यासाठी अनेक गोष्टी महिला फॉलो करतात. पण प्लस साईज महिलांना बऱ्याजदा त्यांच्या आकाराचे कपडे अथवा इतर गोष्टी मिळण्यासाठी जास्त त्रास होतो. नक्की कसा लुक करायचा याची चिंता त्यांना अनेकदा सतावते किंवा आपण जे कपडे घालणार आहोत अथवा जी स्टाईल करणार आहोत, ती आपल्याला नीट तर दिसेल ना कोणी हसणार तर नाही ना असे अनेक प्रश्नही त्यांच्या मनात असतात. प्लस साईज (Plus Size) असणं यामध्ये आपल्याला लाज वाटण्यासारखं काहीच नाही. तुम्ही प्लस साईज असाल तर तुम्ही आपल्यासाठी कपडे निवडताना अगदी आत्मविश्वासाने कपडे निवडा आणि त्याची स्टाईल करा. आपल्या शरीराच्या आकारानुसार फॅशन आणि स्टाईल केली तर नक्कीच तुम्हीदेखील अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसू शकता. यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

प्लस साईज महिलांसाठी काही खास फॅशन टिप्स (Fashion Tips For Plus Size Women)

सौजन्य – Instagram
  • प्लस साईज महिलांनी नेहमी लहान पॅटर्नवाले प्रिंटेड कपडे निवडावे
  • स्लीव्ह्जसाठी नेहमी मिनिमल डिझाईनची निवड करा 
  • तसंच स्लीव्ह्जसाठई तुम्ही ढगळ स्लीव्ह्जच्या डिझाईन्सचा वापर करू शकता 
  • स्ट्रीप्स डिझाईन्स अत्यंत लक्षपूर्वक निवडा. तुम्ही नेहमी वर्टिकल स्ट्रीप्स (Vertical Strips Designs) निवडा. ज्यामध्ये तुम्ही अधिक बारीक दिसता 
  • फुगणाऱ्या कपड्यांपेक्षा अत्यंत मऊ आणि अंगाला बसेल असे कापड निवडा. तसंच ऑर्गेंझा साडी (Organza Saree) वा असे कपडे निवडू नका 
  • नेकलाईनवर लक्ष द्या आणि अधिक रूंदीची नेकलाईन (Neckline) निवडू नका 
  • स्लिम फिट जीन्स (Slim Fit Jeans) वापरा आणि बॅगी जीन्स घेणं टाळा 
  • तुमच्या कपड्यांसाठी तुम्ही गडद रंगांचा वापर करा. ए – लाईन कुर्ती (A – Line Kurti) अथवा ड्रेस घालणे अत्यंत उत्तम. असं केल्यामुळे तुमचे पोट मोठे असेल तर ते झाकले जाईल. तसंच फ्लेक्स कुर्ती वा अनारकली कुर्ती घालणे टाळा 
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कपड्यांच्या आत बॉडी शेपरचा (Body Shaper) वापर करू शकता. असं केल्यामुळे तुमच्या शरीराचा आकार व्यवस्थित दिसून येईल
  • अधिक ढगळ कपडे घालू नका. शक्यतो नॉर्मल फिटिंगचे कपडे वापरा. अनेकदा प्लस साईज महिलांना ढगळ कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. पण असं केल्याने तुमच्या शरीराचा आकार खराब दिसू शकतो

तुम्हाला स्टायलिश (Stylish Look) दिसायचे असेल तर तुम्ही या टिप्स नक्की लक्षात ठेवा. प्लस साईज महिलांनी (Stylish Look Tips For Plus Size Women) खरेदीला जाताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास, कपड्यांची निवड करणे अधिक सोपे होईल आणि तुमचा लुकही अधिक उठावदार दिसून येईल हे नक्की!

Leave a Comment