नणंदानी कधीही करु नयेत या चुका

 नाती म्हटली की त्यामध्ये थोडे गैरसमज आणि भांडण आलीच. नवरा- बायको, भावजय- जाऊ, सासू- सून आणि नणंद- वहिनी अशा काही भांडणांच्या जोड्या अगदी ठरलेल्या असतात. या नात्यात कधी ना कधी गैरसमज होतात आणि दुरावा येतोच. घरात नव्याने आलेल्या सूनेसोबत ॲडजस्ट होताना थोडासा वेळ नक्कीच जातो. कारण बाहेरुन आलेल्या मुलीला सगळ्याच गोष्टी नव्या असतात. तिच्या जवळच्या लोकांपासून ती देखील दूर आलेली असते. अशावेळी नवऱ्यासोबत इतरांनीही काही गोष्टी सांभाळून घेतल्या तर नाती अधिक सुखकर होण्यास मदत मिळतात. आता विषय वाचून असे वाटेल की, केवळ नणंदाच चुकतात का? तर असे अजिबात नाही. पण वहिनीला नणंदही खूप जवळची असते. तितकीच नणंद (Sister In Law) आणि वहिनीचे पटत नाहीत असे अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे आज आपण नणंदानी कोणत्या चुका करु नयेत हे जाणून घेणार आहोत. 

लगेच मत बनवू नका

घरात येणारी आपल्या भावाची बायको अशीच असावी असे नणंदाना वाटते. तसे वाटणे स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी घरातील नातील जपलेली असतात. अगदी त्याचप्रमाणे त्यांना येणाऱ्या सुनेने जपावी अशी वाटतात. त्यामुळे घरात आलेल्या पहिल्या दिवसापासून खूप जणी वहिनीकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. ती काय करते? ती अशी का वागते ? तिने असं करायला नको असे प्रत्येक नणंदेला वाटते. फार क्वचित नणंदा एखादी चूक अनावधानाने झाली तर परिस्थिती सांभाळतात. पण काही जणी मात्र सगळ्यांना चूक लक्षात येण्यासाठी ती चूक पुन्हा पुन्हा घडू देतात. तुमची वहिनी कशी वागते किंवा कोणत्या परिस्थिती कसे निर्णय घेते यावरुन तिला अजिबात वेगळे समजण्याचा प्रयत्न करु नका.त्यामुळेच खरी भांडणांना सुरुवात होते. 

हस्तक्षेप टाळा 

ज्यावेळी तुम्ही नणंद असता. त्यावेळी तुमचेही लग्न होणे आणि तुम्हालाही नणंद असणे आलेच नाही का? खूप नणंदा या सगळ्या गोष्टी आपल्या हातात ठेवू पाहताना समोरच्या व्यक्तिला धाकात ठेऊ पाहात असतात. पण ही वेळ कधी येते ज्यावेळी नणंदाना सासरी त्यांच्या मनाप्रमाणे वागता येत नसेल किंवा त्यांना तो तोरा मिरवता येत नसेल तर त्या अनेकदा माहेरी येऊन आपल्या वहिनीवर किंवा माहेरी काही नियम लावण्याचा प्रयत्न करतात. जर माहेरच्या अनेक निर्णयात तुमचा हस्तक्षेप असेल तो आताच टाळा. कारण असा हस्तक्षेप तुम्हालाही तुमच्या घरात त्रासदायक ठरु शकतो. 

उगाचच भांडण करु नका

एखादी गोष्ट आपल्या घरात आपल्या मनाप्रमाणे झाली नाही तर त्रास होणे साहजिक आहे. पण घरात ज्यावेळी एखादी नवी व्यक्ती येते त्यावेळी तिला तिच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी करु देणे गरजेच्या असतात. पण काही जणींना दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या गोष्टी आवडत नाही. शिवाय आपल्या हक्काचे प्रेम हे नव्या आलेल्या व्यक्तिला मिळेल हे देखील सहन होत नाही. अशावेळी खूप जण कारण नसताना काही तरी उगाच इतरांच्या मनात पेरण्यास सुरुवात करतात. जर नणंद म्हणून तुमच्यावर घरातील मनापासून प्रेम करणारे असतील तर ते हमखास तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे भांडणांना सुरुवात होते. 

नियम समजवण्यास जाऊ नका

जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमचा माहेरी वावर असेल तर घरात वहिनी आल्यानंतर तो वावर कमी करण्यापेक्षा इतरांना त्रास होईल असा नसावा याची काळजी घ्यायला हवी. खूप जणी या माझे कुटूंब आम्ही काय करतो, काय नाही किंवा तुला काहीच त्रास नाही. मला इतका त्रास दिला. असे काही सांगण्यात अर्थ नसतो. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि कुटुंब देखील त्यामुळे तुम्हाला त्रास होतो तो तुमच्या घरात आलेल्या व्यक्तिला होत नाही यात तुम्हाला आनंद हवा. त्याबद्दल सारखे बोलून तुम्ही मोठेपणा करत असाल तर आताच थांबवा. 

दुसऱ्यांचे उदाहरण देऊ नका

आम्ही तुला वहिनी असून काहीही करायला लावत नाही. … तिच्याकडे बघ तिला सगळं करावं लागतं. तू फार लकी आहेस तुला काहीच काम नाहीत आणि आम्हीही तुला काही करु देत नाही. असे उदाहरण खूप जणांना देण्याची सवय असते. हे उदाहरण देताना तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा स्वत:चा विचार करणे अधिक गरजेचे असते. त्यामुळे असे उदाहरण देऊन नाहक  तुमच्याबद्दल मत खराब करुन घेऊ नका.  कारण अशामुळे तुम्हाला काय म्हणायचे आहे याचे अनेक अर्थ निघू शकतात. उदा. तुम्हाला अधिक त्रास व्हावा असा त्यातून एक अंदाज काढला जाऊ शकतो. 

नणंदा लग्न झालेल्या नसतील तर वहिनीसारखी एक उत्तम मैत्रीण असूच शकत नाही. तिच्यासोबत मैत्री करुन तुम्ही तुमच्या घराला आनंदी ठेवू शकता. तुम्ही सासरी जाताना तिला रडू आले तर तुम्ही नक्कीच तिच्याशी चांगले वागलात याचा आनंद तुम्हाला नक्की होईल. 

Leave a Comment