या 5 सवयी असतील तर तुम्हीही व्हाल ‘आदर्श जोडी’

अनेकदा आपण बाहेर गेल्यावर अथवा आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या जोड्या अर्थात कपल्स (Best Couple) पाहात असतो. त्यांचं निरीक्षण साहजिक त्यांच्या वागण्यावरून केलं जातं. काही जोड्या या खूपच आदर्श वाटतात आणि मग आपला जोडीदारदेखील असाच असावा असंही वाटतं. पण खरं तर नात्यात आदर्शता टिकवणं हे दोघांच्याही वागणुकीत आणि सवयीत असायला हवं. तरच तुम्ही एक आदर्श जोडी दुसऱ्यांसाठी ठरू शकता. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासह नेहमी आनंदी राहायचं (How To Be Happy With Your Partner) असेल आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही आदर्श ठरावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला नात्यामध्ये काही सवयी असणं अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अगदी खूप काही करावं लागणार आहे असं अजिबात नाही. तर आपल्या नात्यातील आनंद टिकविण्यासाठी अगदी लहान लहान आनंद जपता यायला हवा. कोणत्या आहेत त्या पाच सवयी घ्या जाणून.

एकमेकांसह गोष्टी शेअर करा (Share Things With Each Other)

तुम्हाला कायम आनंदी राहयचं असेल आणि आदर्श जोडी व्हायचं असेल तर तुम्ही एकमेकांपासून काहीही लपवणं चुकीचं ठरतं. एकमेकांशी लहानमोठ्या कुरबुरी होणं हे नक्कीच चांगलं आहे. पण सतत भांडणं नको असतील तर तुम्ही एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करायला हव्यात. यामुळे तुमच्यातील नातं आणि विश्वास अधिक घट्ट होतो. तुम्ही काहीही लपवत असाल तर असं करू नका. तुमच्या जोडीदाराला तुमच्या खऱ्या आणि खोट्या दोन्ही गोष्टी तुम्ही स्वतः सांगितल्यास, त्यांना ते समजून घेणं अधिक सोपं होतं.  

एकमेकांना आदर देणे (Respect Each Other)

सौजन्य – Freepik

कितीही राग आला अथवा भांडण झालं असेल तरी एकमेकांना अनादर करू नका. कधीही आपल्या जोडीदाराला त्याची कमतरता दाखवून देण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांचा कायम आदर केल्यास, तुम्ही आनंदी राहाल. तसंच एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांच्या भावना जाणून घ्या. आपलाच हेकेखोरपणा करत मनं दुखावू नका. आदर हा आपल्या प्रेमाचा पाया असतो. त्यामुळे नात्यात तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. 

लहान गोष्टीही करा साजऱ्या (Celebrate Small Moments)

अगदी लहानसहान गोष्टीही एकमेकांबरोबर साजऱ्या करा. नोकरीच्या ठिकाणी वर्षपूर्ती असो अथवा तुमची प्रपोज अॅनिव्हर्सरी असो वा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तो दिवस असो. आठवणींना उजाळा देत एकमेकांसह हा दिवस साजरा करा. जर तुमच्या जोडीदाराचा मूड अशा दिवशी खराब असेल तर तो सुधारण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना पुन्हा एकदा प्रेमाची जाणीव करून देत त्यांचा मूड फ्रेश करा. 

भविष्याच्या बाबतीत चर्चा करा  (Discuss Future)

तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमची स्वप्नं आणि तुम्ही त्यांच्यासह नक्की काय भविष्य पाहताय याबाबत चर्चा करा. तुमच्या स्वप्नात त्यांना समाविष्ट करून घ्या. असं केल्यामुळे अर्थात अशी सवय असेल तर तुमचा जोडीदार कायम तुम्हाला साथ देण्यासाठी तयार राहील. एकमेकांना जास्त समजून घेता येईल. तसंच तुम्ही एकमेकांना काय आवडतं याचाही विचार करा. कधी कधी अपेक्षा नसताना लहानसे गिफ्ट देऊनही तुम्ही त्यांना सरप्राईज करू शकता आणि आपलं नातं कायम तरूण ठेऊ शकता. ज्यामुळे तुम्ही एक आदर्श जोडी दिसता. 

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची संधी सोडू नका (Show Your Love On Public Places)

सौजन्य – Freepik

तुम्हाला कधी एखाद्या पार्टीत वा सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदारावर आपलं किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याची संधी मिळाली तर कधीही मागे हटू नका. तुम्ही नेहमी आपलं प्रेम जोडीदारासाठी व्यक्त करा. असं केल्यामुळे तुमच्या जोडीदाराला अभिमान वाटतो आणि अधिक प्रेम वाटते. तसंच ते तुम्हाला तितकाच आदर आणि प्रेम देतात. 

या पाच सवयी तुम्हाला नात्यामध्ये असतील तर तुम्ही नक्कीच आदर्श जोडी ठरू शकता यामध्ये काहीच शंका नाही. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासह आनंदी असणे अत्यंत गरजेचे आहे. 

Leave a Comment