अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटमची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन असणारा “मधुरव” आता रंगभूमीवर

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम (Madhura Velankar – Satam) आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा प्रयोग करत आहे. तो प्रयोग म्हणजे ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ (Madhurav – Boru te Blog) हा कार्यक्रम मधुरा रंगमंचावर घेऊन येत आहे. नुकताच ह्या कार्यक्रमाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. मधुरानं या कार्यक्रमाची घोषणा एका टीजरद्वारे केली.  मधुरानं ‘मधुरव’ हे पुस्तक 2019 मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णतः बंद असताना “मधुरव”चे ऑनलाइन पद्धतीने प्रयोग केले. त्या उपक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसादही मिळाला होता. मधुरा दरवर्षी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करते. यंदाच्या वर्षी ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’  रंगमंचीय कार्यक्रमाची निर्मिती मधुरा करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. 

मराठी भाषा अधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी 

‘गेली दोन वर्ष मराठीत एम.ए. चा अभ्यास करत असताना मराठी भाषेविषयी मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी मला समजल्या. त्या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत असे मला वाटले आणि म्हणूनच मराठी साहित्यातील आजवर न ऐकलेले लिखाण, मनोरंजन, माहितीपूर्ण आणि संवाद साधता येणारा मधुरव – बोरू ते ब्लॉग’ असा हा अनोखा कार्यक्रम करण्याचे मी ठरविले.’ अशी माहिती मधुरा वेलणकर साटमने दिली आहे. तर या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका मी पार पाडणार असल्याचेही अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी सांगितले. कोविड काळात “मधुरव” या ऑनलाईन पार पडलेल्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच या कार्यक्रमाला “कोविड योद्धा” या पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले. या वर्षाअखेरीस आता हा कार्यक्रम रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षका या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार नाही.

मधुरा सध्या मालिकेत व्यस्त 

मधुराने अनेक वर्षांनी ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) या मालिकेतून लहान पडद्यावर पदार्पण केले. तर ही मालिक सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. कमी भागाची आणि अत्यंत गुंतवून ठेवणारी अशी या मालिकेची कथा आहे आणि मधुराने नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनाला भावणारे असे काम मालिकेतून केले आहे. तर मधुराच्या आता या नव्या मधुरव कार्यक्रमालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल अशी मधुराला आशा आहे. मधुराने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम केले आहे. तर या कार्यक्रमामध्ये ती तिहेरी भूमिका निभावत आहे. ऑनलाईन या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता रंगभूमीवर प्रेक्षक कशी साथ देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ अवतरणार रुपेरी पडद्यावर

अभिनेत्री संस्कृती बालगुडे झाली ‘बेभान’

Bigg Boss 16 | शालीन आणि सुम्बुलची या कारणामुळे होतेय चर्चा

Leave a Comment