Bigg Boss 16 | शालीन आणि सुम्बुलची या कारणामुळे होतेय चर्चा

बिग बॉसचे घर तेथील भांडणांसोबत प्रेमासाठीही प्रसिद्ध आहे. आता या नव्या सीझनमध्येही काही जोड्या बनू लागल्या आहेत.आम्ही बोलत आहोत स्पर्धक सुम्बुल (simbul) आणि शालीनबद्दल..(shalin bhanot) सीझन सुरु झाल्यापासून सुम्बुल ही शालीनच्या मागे मागे दिसून आली आहे. इतक्या लवकर या खेळता लव्हगेम सुरु केल्याचा फायदा सुम्बुलला होईल असे अजिबात दिसत नाही. पण यामुळे ही दोघंही चर्चेत मात्र नक्कीच आली आहे. चला जाणून घेऊया या विषयी अधिक 

कोण आहे शिव ठाकरे

सुम्बुल शालीनच्या मागे

घरात आता आठवडा पूर्ण झाला आहे. या घराची घडीही अद्याप नीट बसली नाही तोच सुम्बुलच्या मनात शालीनविषयी काही खास प्रेम निर्माण झालेले दिसत आहे. शालीनने सुम्बुलकडे जरासे दुर्लक्ष केले की, सुम्बुलचे घरातील वागणे बदलते हे अनेकांनी पाहिले आहे. सुम्बुल प्रेम आहे असे जरी सांगत नसली तरी देखील तिच्या वागण्यावरुन ती त्याच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे शालीनकडून असे काहीही होताना दिसत नाही. शालीनने मैत्रीपलीकडे काहीही नसल्याचे सांगितल्यामुळे त्याने आपली बाजू ही स्पष्ट केली आहे. पण तरीही सुम्बुलकडून काहीही बदल होताना दिसत नसल्यामुळे यामुळे तिचा खेळ खराब होणार यात काहीही शंका नाही. 

सुम्बुलचा बालिशपणा कंटाळवाणा

घरात सुम्बुल सगळ्यात लहान आहे. पण तिला काही गोष्टींची अजिबात जाणीव नाही असे दिसून येते. आपल्याभोवती सतत कॅमेरा असताना आपले असे वागणे फॅन्ससाठी चांगले नाही. इमली या मालिकेत लीड रोल साकारणाऱ्या या अभिनेत्रीचा फॅनबेस्ड खूपच चांगला आहे. अशात तिने एखादा लव्ह अँगल आणणे हे अजिबात चांगले नसणार आहे. शालीनच्या आजुबाजूला असण्याने तिचा खरेपणा हा दिसून येत नाही. तर ती पडद्यावर अधिक बालिशपणा करताना दिसून येत आहे. त्यामुळे उत्तम खेळासाठी तिने हे थांबवणे गरजेचे आहे.

शालीनचा घटस्फोट

शालीन भनौत हा देखील अनेक मालिका आणि चित्रपटांमधून घरोघरी पोहोचलेला चेहरा आहे. 38 वर्षांच्या शालीनचे लग्न अभिनेत्री दलजीत कौरसोबत 2009मध्ये झाले. या दोघांना एक मुलगा देखील आहे. शालीन आणि दलजीत या दोघांनी नच बलियेमध्ये एकत्र भाग घेतला आणि ही जोडी जिंकली सुद्धा होता.लग्नाच्या काहीच वर्षानंतर म्हणजेच 2015 साली त्यांनी घटस्फोट घेतला. यामागे शालीन कारणीभूत असल्याचे दलजीतने सांगितले होते. दलजीतला शालीनकडून मारहाण होत असल्याचे तिने सांगितले होते. पण तिने या संदर्भात पुढे जास्त कोणतीही माहिती दिली नाही. बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये दलजीतदेखील आली होती. आता तीन वर्षांनी शालीन आल्यानंतर त्यानेही त्याच्या खासगी आयुष्यासंदर्भात काहीही बोलणे टाळले आहे. 

दरम्यान, शालीन आणि सुम्बुलची ही जोडी तुम्हाला कशी वाटते नक्की कळवा 

अधिक वाचा

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

फोटोग्राफर्सवर चिडली अनुष्का, जनतेने केले ट्रोल

Leave a Comment