Diwali| दिवाळीच्या आधी घरात करा हे बदल, होईल फायदाच फायदा

‘ दिवाळी सण मोठा आनंदाला नाही तोटा’ दिवाळीची चाहूल लागली की, घरात साफसफाईला सुरुवात होते. अगदी आठवडाभरावर दिवाळी आली आहे म्हणजे घरोघरी फराळाची तयारी नक्कीच सुरु झाली असेल. या फराळासोबतच दिवाळी हा असा सण आहे ज्या काळात अनेक जण घर सजावट करायला घेतात. घराचे वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहावे असे वाटत असेल तर घरात कायम सकारात्मक बदल करणे गरजेचे असते. खूप पैसे न घालवता काही सोपे बदल करता आले तर ते नक्कीच फायद्याचे असतील नाही का? चला जाणून घेऊया दिवाळीच्या आधी घरात नेमके कोणते बदल करावेत ते….

Dhanteras 2022: धनत्रयोदयीचा मुख्य देव धन्वंतरीचे मंदिर कुठे आहे भारतात, घ्या जाणून

भिंती रंगवा

भिंतीना द्या रंग (सौजन्य: Freepik)

भिंती रंगवण्याचा पर्याय हा स्वस्तात मस्त नाही हे आम्ही देखील जाणतो. पण तरीदेखील जर तुमच्या घराच्या भिंती खूपच जास्त खराब झाल्या असतील तर किमान त्यावर रंगाचा साधा पोत चढवायला अजिबात विसरु नका. ज्यांच्या घराच्या भिंती या काळ्या किंवा रंग गेलेल्या असतात अशा घरात कधीही आनंद आणि लक्ष्मी टिकून राहात नाही. त्यामुळे जर तुमच्या घराच्या भिंती खराब झाल्या असतील तर तुम्ही हमखास भिंतींचे काम करा. खूप रंग नको पण पांढरा रंग हा देखील तुमच्या घराला एक चांगला लुक नक्कीच देऊ शकतो. 

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

जुने टाकून द्या 

घरात असे बरेच सामान असते ज्यांचा वापर आपण फारच कमी करतो किंवा करतही नाही.  अशा वस्तू घरात केवळ एक अडचण म्हणून असतात. तुमच्या घरातही अशाच काही जुन्या गोष्टी असतील तर ते आताच काढून टाका. घरात असलेली अडगळ ही लक्ष्मीला तुमच्या घरापासून दूर ठेवत असते. घर लहान असो वा मोठे जर ते स्वच्छ नसेल तर अशा घरात लक्ष्मी वास करत नाही हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे जुने जर काही घरात राहिले असेल तर ते आताच्या आता काढून टाका 

घरातील बंद दिवे बदला

खूप जण घरातील इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींकडे फार दुर्लक्ष करतात. एखादं बंद पडलेलं घड्याळ किंवा बंद पडलेले लाईट्स असतील तर ते आताच्या आता दुरुस्त करा. कारण अनेकदा आपण त्या गोष्टी क्षुुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष करत राहतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही घरातील बंद दिवे बदला. ते बदलल्यानंतर घरात येणारा उजेड हा नक्कीच प्रसन्नता आणणारा असतो.

घरातील झाडांची घ्या काळजी

झाडांची घ्या काळजी

हल्ली सगळ्यांच्याच घरात झाडं असतात. झाडं ही घरात सकारात्मक उर्जा आणण्यासाठी नक्कीच चांगली असतात. पण असे करताना खूप जण इंडोर आणि आऊटडोअर झाडांची छाटणी करत नाही. पण झाडांची छाटणी करणे फारच जास्त गरजेचे असते. जर तुम्ही योग्य पद्धतीने झाडांची छाटणी केली तर ती घरात अधिक चांगली दिसतात. झाडांची जास्त वाढ झाली तर त्या ठिकाणी अडचण तयार होऊ लागते जी अजिबात चांगली दिसत नाही. त्यामुळे घरात झाडं असतील तर त्यांची सुकलेली पाने काढून टाका.

आता दिवाळीच्या सुरुवातीला अगदी हमखास या गोष्टी करा आणि तुमच्या घरात आलेला आनंद अनुभवायला विसरु नका 

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

Leave a Comment