पित्ताचा त्रास (Acidity) होत असेल तर करा हे सोपे उपाय

 आपल्यापैकी कित्येकांना पित्ताचा त्रास होतो. पित्त (Acidity) झाले की, अगदी नकोसे होते. काहीही खावेसे वाटत नाही. पित्ताचा त्रास झाला की काहींच्या हातावर चट्टे उठू लागतात. लाल रंगाचे चट्टे आल्यानंतर त्याला खाज येऊ लागते. खूप जणांना पित्त झाल्यानंतर डोकेदुखी, पोटदुखी आणि उल्टी असाही त्रास होऊ लागतो. तुम्हालाही सतत पित्ताचा त्रास होत असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. जेणेकरुन तुम्हााला होणारा पित्ताचा त्रास कमी होईल. शिवाय लवकर आराम मिळण्यासही मदत मिळेल. 

पित्त कशामुळे होते?

पित्ताचा होतोय त्रास

आयुर्वेदात पित्त या संकल्पनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पित्ताचा आजार हा पचनाशी निगडीत असा आजार आहे. शरीरातील अन्नाचे पचन करण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात. पण ही क्रिया सुरळीत झाली नाही तर काही दोष निर्माण होतात.त्यापैकी एक दोष म्हणजे पित्त होय.  जल आणि अग्नी या तत्वापासून याची निर्मिती होत असते. आम्लपित्तामुळे अंगावर पुरळ येणे, पोटात ढवळणे आणि उल्टी होणे असे त्रास होतात. 

पित्ताचा त्रास झाल्यावर काय करावे?

पित्ताचा त्रास जर तुम्हाला वरचेवर होत असेल तर अशावेळी काही सोपे उपाय करुन तुम्हाला आराम मिळवता येऊ शकतो.

  1.  खूप उपवासानंतर तुम्ही काही खाल्ले असेल तर अशावेळी अन्न पचायला थोडासा वेळ लागतो. अशावेळी तुम्ही जेवणानंतर लिंबाचा रस घेतला तर तुुम्हाला बरे वाटेल. 
  2. ज्यांना जेवणानंतर सतत करपट ढेकर किंवा अन्न वर आल्यासारखे वाटत असेल तर अशांनी गुळाचा एक खडा चघळावा. त्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळते. 
  3. थंड दूध हा ही ॲसिडीटीवरील खूप चांगला असा उपाय आहे. तुम्ही उपाशी पोटी थंडगार दूध प्याल तर तुम्हाला नक्कीच त्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळेल. 
  4. कोकमचा रस हा सुद्धा पित्तासाठी फारच चांगला आहे. बाजारात कोकम आगळ मिळतो. तो आगळही तुम्ही पाण्यात घालून आबंट असा रस पिऊ शकता किंवा तुम्हाला गोड कोकमचा थंडगार रस मिळाला तरी देखील तो चालू शकेल. या रसात तुम्ही थोडी जीरे पूड घातली तर तुम्हाला त्यामुळे अधिक फायदा मिळेल. 
  5. मुळा हा देखील पित्तावर खूप चांगला आहे. मुळ्याच्या चकत्या करुन त्यावर लिंबाचा रस आणि काळेमीठ घालून चावून चावून खाल्ल्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळते. 
  6. तूप हे देखील  पित्तासाठी खूपच चांगले असते. तुम्ही एक चमचा तूपाचे सेवन करुनही पोटात पडलेली आग शमवू शकता. 
  7. उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळेही पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 

आता जर तुम्हाला पित्ताचा त्रास झाला तर नक्कीच हे काही सोपे उपाय तुम्ही करुन पाहायला हवेत. 

Leave a Comment