म्हणून संकष्ट चतुर्थीला आहे अनन्यसाधारण महत्व

 गणपती बाप्पाचे स्थान हे आपल्या सगळ्यांच्या मनात एकदम खास आहे. कोणतेही संकट असो की आनंदाचा क्षण ओठांवर गणपती बाप्पा मोरया असे आल्यावाचून राहात नाही. अशा लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने पूजा करण्याची अनेक संधी भक्तांना मिळते. गणेशोत्सव वगळता वर्षभरात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी या देखील तितक्याच महत्वाच्या असतात. हिंदू पंचागानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi)असते. त्यामुळे वर्षभरातून आपल्याला तब्बल 12 संकष्ट चतुर्थी साजरा करता येतात. जर अधिक मास आला तर वर्षभरात एकूण 13 संकष्ट चतुर्थी येतात. या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने महिन्यातून एकदा तरी मोदक करण्याचा योग येतोच. उकडीचे मोदक ऐकूनच तोंडाला पाणी सुटते नाही. पण या संकष्ट चतुर्थीचे नेमके महत्व काय ते आता आपण जाणून घेऊया. 

नवरात्रीच्या रंगाचे काय आहे महत्व

संकटातून होते मुक्तता

सिद्धिविनायक

आपल्या पौराणिक ग्रंथात प्रत्येक गोष्टीसाठी कारणमींमासा देण्यात आलेली आहे. संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi) पाळण्यामागेही काही कारण आहेत. या संदर्भात एक कथा सांगितली जाते. ती अशी, की एकदा गणपती बाप्पा आपल्या मुषक वाहनावर बसून विहार करत होते. अचानक त्यांना हसण्याचा आवाज आला. ते इथे तिथे पाहू लागले. त्यांनी ज्यावेळी वर पाहिले त्यावेळी त्यांना चंद्र त्यांच्याकडे पाहून हसताना त्यांना दिसला. बाप्पांना राग आला चंद्राला शाप दिला. आजपासून तुझ्याकडे कोणीही पाहणार नाही आणि जो तुझ्याकडे पाहिल त्यावर चोरीचा आळ येईल. मिळालेल्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने खूप मोठे तप केले. गणपती बाप्पाला प्रसन्न केले. गणपती बाप्पा त्याला शापातून मुक्त करतात पण गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुझ्याकडे पाहिल त्यावर चोरीचा आळ येईल अशी अट घालतात. त्यावर चंद्र जर चुकून कोणी माझ्याकडे पाहिले तर त्याला या शापातून मुक्ती मिळण्यासाठी काय करावे लागेल. असे चंद्राने विचारले त्यावर बाप्पाने सांगितले की, जो कोणी संकष्ट चतुर्थी आणि अंगारकीचे व्रत करेल त्याला या शापातून मुक्ती मिळेल.

या संदर्भात असे देखील सांगितले जाते की, भगवान श्रीकृष्णावर देखील असाच चोरीचा आळ आला होता. त्यांनी सम्यतक नावाचा मणी चोरला अशी बोंब उठली होती. त्यांनी गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यामुळे असे झाले असा उल्लेख पुराणात आहे. त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान कृष्णांनी देखील संकष्टीचे व्रत पूर्ण केले. 

 चतुर्थी आहे महत्वाची

बाप्पाला आवडणारे मोदक ( सौजन्य: इन्टाग्राम )

 आता प्रश्न पडका असेल की, संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi)आणि अंगारकी चतुर्थी यातला नेमका फरक का? संकष्ट चतुर्थी ही पंचागानुसार चंद्रदर्शन हे याचे सगळ्यात मोठे उद्दिष्ट आहे. चंद्राच्या अस्त होणाऱ्या पंधरवड्यात संकष्ट चतुर्थी येते. जी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार असल्यामुळेच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. अनेक जण संकष्ट चतुर्थी आणि अंगारकी ही मोठ्या भक्तिभावाने पाळतात. हे व्रत करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दिवशी उपवास करुन संकष्ट महात्म्य व्रत वाचावे त्यामुळे बाप्पाची कृपादृष्टी तुमच्यावर राहिल.

माहिती आवडली असेल तर Dazzle Marathi ला लाईक करायला विसरु नका. 

अधिक वाचा : नवरात्रीची माहिती आणि कथा

Leave a Comment