नवरात्रीचे रंग ठरतात तरी कसे, अशी करा तयारी

नवरात्रीच्या दिवसाचा आणखी एक आनंद म्हणजे या नऊ दिवसात आपल्याला नवरंगाचे कपडे वेगवेगळ्या दिवसात घालता (Navratri Colors) येतात. एरव्ही रंगाचा कधीही विचार न करणाऱ्या आपल्याला या कालावधीत काही ठराविक रंगाचे कपडे घालण्याचा मोह काही केल्या आवरता येत नाही. साधारण नवरात्रीच्या आधी एक आठवडा या रंगाचा तक्ता हा सगळीकडे फिरतो. पूर्वी केवळ वर्तमानपत्रात हे वेळापत्रक यायचे पण आता मात्र जगच फास्ट झाले आहे. व्हॉटसॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगाचा हा तक्ता फिरत राहतो. पण हे रंग कसे ठरतात तुम्हाला माहीत आहे का? अमूक दिवशी हाच रंग का येतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेऊया. सोबत या रंगाचे महत्व. या शिवाय नवरात्रीचे महत्वही जाणून घ्या

प्रत्येक वाराचा असतो एक रंग

नवरात्रीच्या नऊ रंगाला आहे फारच महत्व

खरंतरं प्रत्येक वारानुसार त्या वाराचा जो अधिपती आहे त्यानुसार हा रंग ठरत असतो. त्यामुळे खास नऊरात्रीसाठी हा तक्ता केला जातो असे नाही. तर इतर दिवशीही तुम्ही त्या त्या वाराला ते रंग घालते तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. उदा. सोमवार या दिवसाचा रंग पांढरा आहे तर शनिवारी या दिवशी काळे कपडे अधिक लाभदायक असतात. त्यामुळे नवरात्र ज्या वारापासून सुरु होते. त्या दिवसानुसार हे रंग ठरत असतात. 

सोमवार (रंग पांढरा)

नवरात्रीचा पहिला दिवस हा यंदा सोमवारी आला आहे. त्यामुळे या दिवशी देवीच्या शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. शैलपुत्रीचे वाहन हे गाय आहे. शिवाय तिने परिधान केलेला साडीचा किंवा वस्त्राचा रंग हा पांढरा आहे. त्यामुळे या दिवशी पांढरा रंग घातला जातो. पण सगळ्याच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोमवार असतोच असे नाही. त्यामुळे जर वारानुसार विचार करायचे झाले तर श्वेतरंग हा शांततेचा आणि शुद्धतेचा मानला जातो. आठवड्याची सुरुवात इतर दिवशीही या रंगाने केली तरी देखील चालू शकते. 

मंगळवार ( रंग लाल)

नवरात्रीच्या रंगाचे महत्व

नवरात्रीचा दुसरा दिवस हा मंगळवारी आला असून हा दिवस लाडक्या बाप्पाचा आणि हनुमानाचा आहे. बाप्पाला वाहिले जाणारे फूल हे जास्वंद आहे. जे लाल रंगाचे असते. त्यामुळे या दिवशी लाल रंग परिधान केला जातो. याशिवाय लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे देखील प्रतिक आहे.

बुधवार (रंग निळा)

 नवरात्रीचा तिसरा दिवस हा बुधवारी आलेला आहे. या दिवशीचा रंग गडद निळा असा आहे.  हा रंग समृद्धी आणि शांती याचे प्रतिक आहे.  निळा रंग हा श्याम वर्ण असा रंग आहे. भगवान कृष्ण आणि  देवी मातंगी यांचा हा रंग आहे. 

गुुरुवार ( रंग पिवळा)

पिवळा रंग आहे महत्वाचा

गुरुवार हा दत्ताचा वार आहे. त्यामुळे अनेक जण या दिवशी पिवळा रंग असाही परिधान करतात. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी यंदा पिवळा रंग आलेला आहे. पिवळा रंग हा उष्मा, उर्जा याचे प्रतिक आहे. 

शुक्रवार ( रंग हिरवा)

हिरवा रंग हा अनेक वास्तुशास्त्र आणि फेंगशुईशास्त्रात खूप चांगला मानला जातो. हिरवा रंग नवरीचा रंग म्हणून जसा प्रसिद्ध आहे. हिरवा रंग विकास आणि शांतता याचे प्रतिक आहे. शिवाय हिरवा रंग हा कोणत्याही महिलेला खूपच सुंदर दिसतो. 

शनिवार ( रंग करडा किंवा काळा)

रंग करडा

शनिवार हा शनि देवाचा वार आहे. शनिचा रंग हा काळा आहे. पण शक्यतो काळा रंग हा अनेकदा शुभ रंग म्हणून वापरत नाही. अशावेळी नवरात्रीत करडा रंग घातला तरी चालतो. करडा रंग हा संतुलित विचारधारेचा आहे. 

रविवार ( रंग केसरी)

  अनेक धार्मिक कामांमध्ये केशरी किंवा नारंगी रंग वापरला जातो. हा रंग उत्साहाचा आणि अत्यंत शांत असा रंग आहे. हा रंग सकारात्मक उर्जा देतो. केसरी रंग हा अनेक देवतेशी निगडीत आहे. यंदा रविवारी केसरी रंग आलेला आहे. 

या शिवाय उरलेल्या दोन दिवसात रंग हे पुन्हा तेच वापरण्याऐवजी सोमवारी मोरपिशी आणि मंगळवारी गुलाबी रंग  आलेला आहे. 

आता यंदाच्या नवरात्रीत तुमच्या कपाटातील कपडे काढा आणि ते नक्की वापरा. 

Leave a Comment