नवरात्र(Navratri)घेऊन येणार आनंद, जाणून घ्या माहिती आणि कथा

 लाडक्या गणपती बाप्पाला निरोप भावपूर्ण निरोप दिल्यानंतर ओढ लागतात ते म्हणजे नवरात्रीचे(Navratri) ठिकठिकाणी देवींच्या मूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आलेला असतो. बाप्पांच्या गाण्यांमधून बाहेर येत नाही तोच मनात आणि ओठांवर देवींची गाणी येऊ लागतात. श्रावणानंतर सुरु होणाऱ्या या सणांमध्ये नवरात्रीला चांगलेच महत्व आहे. येणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत या नवरात्रीची…नवरात्र का साजरी केली जाते? त्यामागील पौराणिक महत्व (Importance Of Navrtri) आणि व्रतवैकल्य या सगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देण्याच प्रयत्न करणार आहोत.

2022 नवरात्रीचे वेळापत्रक

देवीची नावे रुपे अनेक

नवरात्र ही देवींच्या नऊशक्तींची पूजा करण्याचा काळ आहे. या आदीशक्तीच्या नऊ रुपांचा जागर या दिवसात केला जातो. 

 यंदा शारदीय नवरात्रीचा प्रारंभ अर्थात घटस्थापना ही अश्विन शु. 1 म्हणजेत 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी 6 वाजून 11 मिनिटांपासून सुरु होऊन तो सकाळी 7 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे.  अश्विन शु. 10 रोजी विजयादशमी/ दसरा आहे. 

या शिवाय अजून महत्वाची गोष्ट ही देवीच्या वाहनासंदर्भात आहे. असं म्हणतात की, नवरात्र ज्या दिवशी सुरु होते. त्या दिवसानुसार देवी आपले वाहन प्राणी निवडत असते. त्या प्राण्यावरही शुभ अशुभ संकेत अवलंबून असतात असे मानले जाते. यंदा नवरात्र ही सोमवारी सुरु होणार आहे. अनेक पुराणात सोमवारी हत्ती हे वाहन असते असा उल्लेख आहे. हत्ती हे आनंद आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या काळात आनंदी आनंद येणार आहे यात काहीही शंका नाही. या शिवाय देवीच्या वाहनाचा विचार केला तर म्हैस, घोडा(युद्धजन्य परिस्थिती), पालखी( साथीच्या रोगाचे संकट), हत्ती आणि होडी (अन्नपाणी चांगले, अनेक शुभ घटना घडण्याचे संकेत)  असे वेगवेगळे वाहन असते.

नऊरात्रीच्या नऊ दिवसांचा नैवैद्य 

वेगवेगळ्या ठिकाणी देवीला नैवेद्य दाखवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. या नऊ दिवसात देवीला निरनिराळा प्रसाद दाखवला जातो. खरंतर हा काळ ऋतूबदलाचा असतो. त्यानुसार  आपल्या आहारातही बदल होत असतात. या काळात येणाऱ्या सणोत्सवामुळे होते असे की, आपण आपल्या खाण्यात अनेक वेगळ्या गोष्टींचा समावेश करतो. 

 आता नवरात्रीच्या या नव्या दिवसात नैवद्यही वेगळा असायला हवा. खालील वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही देखील देवीला घरी बनवून नैवेद्य दाखवू शकता. 

  1. 26 सप्टेंबर ( सोमवार) –  साजूक गायीचे तूप 
  2. 27 सप्टेंबर( मंगळवार)-  साखरेचा नैवेद्य 
  3.  28 सप्टेंबर (बुधवार ) -दूध किंवा दूधाचे पदार्थ 
  4. 29 सप्टेंबर (गुरुवार) – मालपुआ 
  5.  30 सप्टेंबर (शुक्रवार) – केळ्यांचा नैवेद्य 
  6. 1 ऑक्टोबर शनिवार ) – मधाची वाटी 
  7. 2 ऑक्टोबर (रविवार )- गूळाचा नैवेद्य 
  8. 3 ऑक्टोबर (सोमवार) -नारळ 
  9. 4 ऑक्टोबर ( मंगळवार) तिळ 

नवरात्रीची कथा  

आई जगदंबा

 हिंदू पुराणात नवरात्री साजरी करण्यासंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी काही निवडक आणि प्रामाणिक कथा पुढीलप्रमाणे 

महिषासुराचा वध

फार फार वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक दैत्य होता. तो ब्रम्हदेवांचा खूप मोठा भक्त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करण्यासाठी मनापासून आराधना केली. त्याला ब्रम्हदेव प्रसन्न झाले. ज्यावेळी आनंदी होऊन ब्रम्ह देवाने त्याला वर मागण्यासाठी सांगितले. महिषासूराने वर मागितला की, मला देव, दानव किंवा पृथ्वीतलावर राहणारा कोणताही मनुष्य मारु शकणार नाही. त्यावर ‘तथास्तू’ म्हणत ब्रम्हदेव तेथून निघून गेले. पण त्यानंतर महिषासूराने हाहाकार माजवण्यास सुरुवात केला तो अनेक निरपराध लोकांना मारु लागला. कंटाळलेल्या देव, दानव आणि मनुष्यांनी ब्रम्हा- विष्णू- महेश यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी त्याल नामोहरम करण्यासाठी देवी शक्तीच्या रुपात देवी दुर्गेची निर्मिती केली. महिषासुराचा संहार करण्यासाठी ती निघाली. हे युद्ध जवळ जवळ नऊ दिवस चालले आणि महिषासुराचा वध करण्यास दुर्गेला यश मिळाले. तिच्या विजयाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नवरात्र साजरी केली जाते.

भगवान रामाचा विजय

महिषासूरमर्दिनी संहार

भगवान रामाची लंकासुराशी म्हणजेच रावणाशी झालेल्या युद्धाची कथा आपण सारेच जाणतो. नवरात्रीच्या शेवटी येणारा दसरा. हा भगवान रामाच्या विजयाचे प्रतिक आहे. त्यादिवशी सोने वाटण्यामागे हा आनंद साजरा करणे असे सांगितले जाते. तर या संदर्भात अशी कथा सांगितली जाते की, भगवान राम माता सीतेला वाचवण्यासाठी लंकेत जाणार त्या आधी त्यांनी देवीची उपासना केली. रामेश्वरम येथील भगवती रुपातील मातेची त्यांनी कित्येक दिवस उपासना केल्यानंतर त्यांनी रावणाशी युद्ध केले. त्यात त्यांना विजय मिळाला तो दिवस होता विजयादशमी.. त्यामुळे ही देखील एक कथा याच्या संदर्भात सांगितली जाते. 

देवीची नावे रुपे अनेक

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते.  पहिला दिवस देवी शैलपुत्री, दुसरा दिवस ब्रम्हचारिणी, तिसरा दिवस चंद्रघटा, चौथा दिवस कुष्मांडा, पाचवा दिवस स्कंदमाता, सहावा दिवस देवी कात्यायनी, सातवा दिवस देवी कालरात्री, आठवा दिवस देवी महागौरी, नववा दिवस देवी सिद्धिदात्रीचा असतो. या कारणामुळेही नवरात्रीचा काळ हा नऊ दिवसांचा असतो. 

 देवींच्या रुपांचा विचार करता देवीची सौम्य रुपातील आणि  उग्र रुपातील नावेही वेगळी आहेत. सौम्य रुपांचा विचार करता देवी पार्वती, जगदंबा, उमा, गौरी आणि भवानी ही शांत अशी रुप आहेत. तर चंडी, दुर्गा, काली, भैरवी, चामुंडी ही देवीची उग्र अशी रुपे आहेत. 

नवरात्रीची ही अत्यंत महत्वाची माहिती संपूर्ण वाचा आणि हो नक्की शेअर करा. 

Leave a Comment