सोशल मीडियावर अक्षय कुमारला (Akshay Kumar) म्हटले जातेय ढोंगी

बॉलिवूडमध्ये असे कमीच कलाकार असतील जे केवळ चित्रपटात काम करुन घरात बसत असतील. बी टाऊनच्या पार्ट्या या सतत होत असतात आणि या पार्ट्यांना सेलिब्रिटी कायम हजेरी देखील लावतात. या पार्टीजसाठी अपवाद म्हणजे अक्षय कुमार. कारण अक्षय कुमार कधीही कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात दिसत नाही किंवा कुठेही रात्री तो सहसा येत नाही. अशातच अक्कीचा रात्री एका पार्टीला जातानाच व्हिडिओ येतो काय आणि तो ट्रोल होतो काय? याला एकच गाठ पडली. अक्षय कुमारला (Akshay Kumar) पार्टीला जाताना पाहून त्याला सोशल मीडियावर ढोंगी असे नाव पडले आहे. 

अक्कीला म्हटले ढोंगी

अक्षय कुमार ज्यावेळी कोणता कार्यक्रम किंवा चित्रपट करणार असतो. अशावेळी त्याची कामाची अट ही सकाळी लवकर उठून असावी अशी असते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनादेखील त्यामुळे सकाळी उठून काम करणे गरजेचे असते. त्याचे सहकलाकार त्याला सकाळी उठण्याच्या सवयीवरुन चांगले बोलतात. पण त्यासोबत त्यांचे हाल कसे होतात हे सांगतानाही ते थकत नाही. असा अक्षय कुमार हा आपल्या नियमांवर चालणारा आणि कोणत्याही पार्टीपासून वाचणारा असा असताना त्याचे अचानक अशा पद्धतीने एखाद्या पार्टीला जाणे खरंतर कोणलाही रुचलेले नाही. त्यामुळेच त्याचा हा व्हिडिओ आल्यानंतर त्याला अनेकांनी ढोंगी म्हटले आहे. अक्षय कुमार खास व्यक्तिच्या वाढदिवसासाठी मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी तो लपून गेला असेही नाही. त्याने फोटोग्राफर्सना अगदी आवडीने पोझ दिली. त्यामुळे त्याला जर कोणाला न दाखवता यायचे होते हा मुद्दाच येथे उरत नाही. पण तरीदेखील त्याने त्याचा नियम मोडला असे अनेकांचे मत आहे. म्हणूनच त्याला ढोंगी म्हटले आहे. 

अक्षय कुमार करत नाही पार्टीज

बॉलिवूडची नशा ही काही औरच आहे. या क्षेत्रात राहून पार्टी करत नसेल अशा व्यक्ती विरळाच आहे. असाच आहे अक्षय कुमार. त्याने आपल्या शिस्तबद्ध लाईफस्टाईलमुळे अनेक गोष्टी टाळल्या आहेत. त्याने कोणत्याही वाईट सवयी लावलेल्या नाहीत. फिटनेस हा त्याचा मूलमंत्र असल्यामुळे तो पहाटे उठतो. रोजचा व्यायाम हा त्याच्यासाठी अगदी महत्वाचा आहे. महत्वाची गोष्ट अशी की, अक्की जे चित्रपट करतो त्याचे सगळे स्टंट तोच करतो. त्यामुळेच त्याला खऱ्या अर्थाने खिलाडी असे म्हटले जाते. शिवाय चित्रपटांचे विचाराल तर अक्षय कुमार हा कधीच एखादा चित्रपट 15 दिवसांच्या अधिक काळ शूट करत नाही.अगदी महिन्याच्या आत चित्रपटाचे शूटिंग संपावे ही त्याची विनंती असते. म्हणूनच की, काय त्याचे जास्तीत जास्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि तो जास्तीत जास्त काळ स्क्रिनवर लोकांना दिसतो. असे असताना त्याला पार्टीत पाहणे कदाचित अनेकांना रुचले नसावे. 

अक्षय कुमारला ही गोष्ट पडेल का महागात

कलाकार ज्यावेळी आदर्श स्थानावर जाऊन पोहोचतात अशावेळी त्यांच्याकडून क्षुल्लक चुका होणे हे देखील चांगले नसते. अशावेळी जर अक्षय असा त्याच्या चाहत्यांना दिसला तर त्याचे ट्रोल होणे स्वाभाविक आहे. पण याचा फटका त्याच्या चित्रपटांच्या चाहत्यावर होईल असे अजिबात दिसत नाही. 

दरम्यान, तुमचे यावर काय म्हणणे आहे. 

अधिक वाचा

Bigg Boss 16 | साजिद-शालीनमध्ये कडाक्याची भांडण, कॅप्टन्सी टास्कवरुन राडा

अभिनेत्री संस्कृती बालगुडे झाली ‘बेभान’

Leave a Comment