दिवाळीत सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण, टीझर प्रदर्शित

यंदा दिवाळी अधिक गोड करण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भेटीला येणार आहेत. दिवाळीत एक नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारा असा हा चित्रपट असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा हा टीझर मनसेच्या अधिकृत पेडवरुन शेअर करण्यात आला आहे. या टीझरमुळेच या चित्रपटाची उत्सुकता देखील वाढली आहे.

दिवाळी आणि ऐतिहासिक नाते

दिवाळी हा आनंद  घेऊन येणारा सण आहे. या सणाचे सांस्कृतिक नातेही तितकेच महत्वाचे आहे. दिवाळीच्या या सुट्टीत मुलांना काहीतरी चांगली माहिती द्यावी अशी इच्छा असेल तर हा चित्रपट उत्तम असणार आहे. अभिजीत देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित अशा या चित्रपटात  स्वातंत्र्याचा संग्राम, बाजीप्रभू देशपांडे याचे रणझुंजार कर्तृत्व पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे केवळ मराठी प्रेक्षकांनाच नाही तर इतर भाषकांनाही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 

सुबोध भावे साकारणार छत्रपती 

आतापर्यंत अनेक कलाकारांनी छत्रपतीच्या भूमिका मोठ्या पडद्यावर साकारल्या आहेत. हरहुन्नरी कलाकार सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या शिवाय चित्रपटात अभिनेता शरद केळकर, अमृता खानविलकर यांच्याही प्रमुख अशा भूमिका आहेत. सुबोध भावेला या नव्या रुपात पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. 

अंगावर येईल काटा

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे

चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. कारण सुबोधने ज्या प्रमाणे ती भूमिका साकारली आहे. त्यानंतर शिवाजी म्हणून दुसरा कोणताही चेहरा समोर येऊ शकणार नाही. या आधी सुबोधने लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर या भूमिका साकारल्या आहेत. आता या भूमिकांमध्ये आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेची भर पडली आहे. त्यामुळे एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांनाही घेता येणार आहे. 

तुम्हाला या चित्रपटाचा टीझर कसा वाटला नक्की कळवा. 

Leave a Comment