पैसे वाचवायचे असतील तर नक्की घ्या मल्टी कलर ब्लाऊज (Multi Color Saree Blouse)

 हल्ली टेलरची शिलाई ऐकून कोणाला घाम फुटणार नाही असे अजिबात होणार नाही. साड्यांपेक्षाही महाग हल्ली ब्लाऊजची शिलाई असते म्हणूनच की, काय खूप जण रेडिमेड ब्लाऊजचा पर्याय निवडतात. पण हे ब्लाऊजही काही स्वस्त नाहीत बरं का! तुमच्या साडीवर मॅचिंग आणि फिटिंगला परफेक्ट बसतील असे ब्लाऊज हल्ली बाजारात मिळतात. पण प्रत्येक साडीवर असे ब्लाऊज घेत राहिलो तर शिवून घेणाऱ्या ब्लाऊजमध्ये आणि रेडिमेड ब्लाऊजच्या बजेटमध्ये काहीही फरक नाही. म्हणूनच अशावेळी तुमच्यासाठी परफेक्ट आहेत ते म्हणजे मल्टी कलर रेडिमेड ब्लाऊज. चला जाणून घेऊया मल्टी कलर ब्लाऊजची फॅशन करताना (Multi Color Saree Blouse)

प्लस साईज महिलांनी या टिप्स करा फॉलो आणि दिसा स्टायलिश

मल्टी कलर ब्लाऊज

उत्तम अशा रेडिमेड ब्लाऊजच्या स्टोअरमध्ये गेलात तर तुम्हाला अगदी हमखास मल्टी कलरचे ब्लाऊज मिळतात. मल्टी कलर अर्थात ज्याध्ये तीन ते चारहून अधिक जास्त रंग असतात. मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये साधारणपणे पिवळा ( गोल्डन), गुलाबी, हिरवा, काळा असे रंग असतात. सर्वसाधारणपणे ते सगळ्या साड्यांवर जातात. तुमच्या कपाटात जास्त कोणत्या रंगाच्या साड्या आहेत ते बघा आणि मगच अशा मल्टी कलर ब्लाऊजची निवड करा. म्हणजे जास्तीत जास्त साड्यांवर हे ब्लाऊज अधिक चांगले दिसू शकतील. शिवाय यामध्ये तुम्हाला मटेरिअलची व्हरायटी मिळते ती वेगळी. 

शिलाईचा विचार करता तुम्हालाही मल्टी कलर ब्लाऊजची खरेदी करायची असेल तर या काही गोष्टी घ्या लक्षात 

महागड्या पैठणी साड्यांची अशी घ्यावी काळजी

ट्रेडिशनल ब्लाऊज

मल्टीकलर ब्लाऊज

प्रत्येकीची एक स्टाईल असते. म्हणजे काही जण काठापदरांच्या साड्या वापरतात तर काही जण कायम फॅन्सी साड्या घेतात. या नुसार तुम्हाला मल्टी कलर ब्लाऊजची खरेदी करायची असते. म्हणजे साड्या या काठापदराच्या असतील तर त्यावर फॅन्सी ब्लाऊज तसाच क्लासी लुक देतील असे नाही. अशावेळी तुम्ही सिल्कमध्ये मिळणारे मल्टीकलर ब्लाऊज निवडा. यावर बुट्टी किंवा छानसी डिझाईन असते.त्यामुळे काठापदराच्या साड्यांना हे ब्लाऊज चांगलेच मॅच होतात. त्यामुळे यावर मटेरिअल निवडताना थोडी काळजी घ्या. 

कोल्हापुरी चपलांची अशी घ्या काळजी

उदा. ब्रोकेट, सिल्क मटेरिअलचे ब्लाऊज 

फॅन्सी ब्लाऊज

सिक्वेन मल्टी कलर ब्लाऊज

खूप जणांच्या कपाटात नक्कीच फॅन्सी साड्या असतील. आता फॅन्सी साड्या कोणत्या तर कटवर्क, पॅचवर्क, सिक्वेन वर्कच्या साड्या या अधिक फॅन्सी असतात.अशा फॅन्सी साड्यांना ब्लाऊज हा काठाचा असून चालत नाही. अशावेळी त्याच्या फॅन्सीनेसला शोभणारी असा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारचे फॅन्सीवर्क कव्हर करता येतील असेही ब्लाऊज हल्ली मिळतात. ज्यामध्ये सिक्वेनच्या वेगवेगळ्या रंगाचे काम केलेले असते. साड्या लाईट, असो वा डार्क त्या अशा मल्टी कलरच्या फॅन्सी ब्लाऊजवर चांगलेच दिसतात. इतकेच काय तर तुम्ही प्लेन साड्यांवरही असे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात. त्यामुळे असा मल्टीकलर ब्लाऊज तुमच्याकडे एखादा तरी असायलाच हवा. 

मल्टी कलर ब्लाऊज हे साधारण 500 रुपयांपासून पुढे मिळतात.यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गळ्यांचे पर्याय देखील मिळतात. 

आता सणासुदीसाठी नव्या साड्यांची खरेदी केली असेल आणि ब्लाऊज शिवायला तितका वेळ नसेल तर असे मल्टीकलर ब्लाऊज तुमच्या साडीचा लुक नक्कीच अधिक खुलवण्यास मदत करेल. 

Leave a Comment