नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो; तुम्हाला हे पटतंय का..

महाराष्ट्राचे दैवत आणि प्रत्येक मराठी माणसाचा सार्थ अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, भारतीय चलनावर लावण्याची मागणी केली जात आहे. यासंबंधीचा फोटोशॉप केलाला एक फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.
 भारतीय चलनातील नोटांवर छत्रपती शिवरायांचा फोटो असावा अशी मागणी करणारं एक ट्वीट, आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे सध्या सर्वच क्षेत्रांत चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनात वापरल्या जाणाऱ्या नोटासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला धरुनच नितेश राणे यांनी हे ट्वीट केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. यामध्ये नितेश यांनी फोटोशॉप केलाला एक फोटोसुद्धा शेअर केला आहे, ज्यात २०० रुपयांच्या नोटेवर महाराजांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे हा फोटोची आणि एकंदरच संपूर्ण प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

एका पत्रपरिषदेत बोलताना, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा मुद्दा काढला. याविषयी बोलत असताना ते म्हणाले, देशाची सद्य आर्थिक परिस्थिती बघता, भारतीय रुपया हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सातत्याने कमकुवत होताना दिसतो आहे. यामुळे देश फायनॅन्शिअल क्रायसिसमधून जात आहे. सर्वसामान्य भारतीय जनतेला याची झळ सहन करावी लागत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपल्या चलनावर भारतीय देवी-देवतांचा फोटो असायला हवा, म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहतील. यासाठी आपण भारतीय चलनातील नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोसोबतच दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचे फोटो ठेवायला हवेत. लवकरच अशा नोटा चलनात येतील, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

ये परफेक्ट है

अरविंद केजरिवाल यांच्या याच मुद्द्याला धरुन, आमदार नितेश राणे यांनी हे ट्विट केलं असल्याचं समजतंय. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘Ye Perfect hai’ असं कॅप्शन देत एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिझर्व्ह बॅंकेचा लोगो असलेली २०० रुपयांची एक नोट आहे ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्यात आला आहे. 

हा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळासह अन्य सर्वच क्षेत्रांतून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांकडूनही या फोटोवर आणि ट्विटवर संमिश्र प्रक्रियात येत आहेत. काहीजणांनी या फोटोचं आणि संकल्पनेचं भरभरुन कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

Leave a Comment