Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

याच आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन 4 सुरू झाला आहे. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांनी तुफान प्रसिद्धी मिळवली असल्याचे दिसून येत आहे. प्रसाद जवादे (Prasad Jawade), अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) या दोन्ही नावासह आता चर्चा होतेय ती म्हणजे स्प्लिट्सविला फेम (Splitsvilla) समृद्धी जाधवची (Samruddhi Jadhav). पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्क पार पडले असून घरातील पहिली कॅप्टन म्हणून समृद्धीची निवड झाली आहे. या सीझनचे पहिलेच कॅप्टनपद समृद्धीकडे गेले आहे. तर बिग बॉसच्या इतिहासात पहिल्याच आठवड्यात पहिली कॅप्टन महिला झाल्याचे दिसून आले आहे. 

पैशांचा पाऊस टास्क जिंकून समृद्धी झाली पहिली कॅप्टन 

चान्स पे डान्स या उपकार्यामध्ये टीम A विजयी ठरली ज्यामध्ये समृद्धी जाधव (Samruddhi Jadhav in Bigg Boss Marathi S4) होती. त्यानंतर टीम B ला देण्यात आलेल्या संधीनुसार टीम ए मधील अनेक स्पर्धक बाद ठरले आणि शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि समृद्धी यांच्यामध्ये पैशांचा पाऊस हा टास्क पार पडला. ज्यामध्ये तेजस्विनीच्या बाजूने प्रसाद, अमृता धोंगडे (Amruta Dhongde), रोहित शिंदे (Rohit Shinde) खेळले तर समृद्धीच्या बाजूने रूचिरा जाधव (Ruchira Jadhav), अक्षय केळकर (Akshay Kelkar), मेघा घाडगे (Megha Ghadge), यशश्री मसुरकर हे खेळले. यामध्ये समृद्धीला जिंकून देण्याचे काम यांनी केले. तर समृद्धीने नियम संचालक म्हणून आता मेघा घाडगेची निवड केली आहे. तर समृद्धी बाकीच्या स्पर्धकांमध्ये वयाने लहान असून आता कॅप्टन्सी कशी सांभाळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कोण आहे समृद्धी जाधव

समृद्धी जाधवने फारच कमी वेळात प्रसिद्धी मिळवली असून हिंदी शो मध्ये आणि सोशल मीडियामध्ये गाजलेले नाव आहे. Splitsvilla X3 मध्ये समृद्धी सहभागी झाली होती. त्याशिवाय सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओद्वारे समृद्धी प्रसिद्ध आहे. मॉडेलिंग आणि अभिनेत्री असा सध्या समृद्धीचा प्रवास सुरू आहे. 

मूळची पुण्याची असणाऱ्या समृद्धीने फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आणि मुंबईमध्ये मॉडेल म्हणून आपले करिअर सुरू केले. समृद्धीचे वडील उपजिल्हाधिकारी असून आई गृहिणी आहे. समृद्धीने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले असून ती राष्ट्रीय स्तरावर स्केटर म्हणूनही नाव कमावले आहे. याशिवाय तिला घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, गायन इत्यादी कलाही अवगत आहेत. समृद्धीने मॉडेल म्हणून विविध लोकप्रिय ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे अगदी लहान वयात समृद्धीने नाव कमावले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! तर आता समृद्धी बिग बॉस मराठीमध्ये काय कमाल दाखवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Bigg Boss 16 |  शुक्रवारचा वार पडला स्पर्धकांवर भारी

Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

Leave a Comment