फोटोग्राफर्सवर चिडली अनुष्का, जनतेने केले ट्रोल

सेलिब्रिटींचे एक्सक्लुझिव्ह फोटो त्यांच्या फॅन्सपर्यंत पोहोचवण्याचे काम फोटोग्राफर्स करत असतात. त्यातील एअरपोर्ट लुकमधील फोटो आणि व्हिडिओ अनेकांच्या पसंतीचे असतात. त्यामुळे पापाराझींची गर्दी कायमच एअरपोर्टवर असते. अशातच अनुष्का (Anushka sharma)आणि विराट कोहली (Virat Kohali) (Virushka) ही जोडी दिसली तर फोटोग्राफर्सना त्याचा आनंद अधिकच असतो. विराट आणि तिचे फोटो काढण्यासाठी पापाराझी नेहमीच पुढे असतात. पण असाच एक फोटो आणि व्हिडिओ काढणे हे फोटोग्राफर्ससाठी महागात पडले आहे. तिच्या मुलीचा फोटो काढला जात आहे असे लक्षात आल्यामुळे ती फारच चिडलेली दिसत आहे. नेमकं काय घडलं ते घेऊया जाणून 

https://dazzlemarathi.com/2022/10/06/bigg-boss-marathi-4-apurva-nemlekar-prasad-jawade-fight-in-marathi/

वामिकाचा फोटो, व्हिडिओ घेऊ नका

अनुष्का एअरपोर्टवर आल्यानंतर तिच्या आणि विराटच्या मागे फोटोग्राफर्स फोटो काढण्यासाठी मागे लागले होते. तिचे फोटो क्लिक करत असताना तिला असे वाटले की, वामिकाचा व्हिडिओ आणि फोटो काढला जात आहे. त्यामुळे तिने लगेचच फोटोग्राफरला इशाऱ्याने झापले. शिवाय तिच्या पीएने देखील वामिकाचा फोटो काढू नका असे सांगितले. त्यावर फोटोग्राफरने स्पष्टीकरण देत सांगितले की, आम्ही वामिकाचा फोटो काढत नाही. तिचा तो उद्धटपणा पाहून नेटीझन्स मात्र चांगलेच संतापलेले दिसत आहे. त्यांनी कमेंटस करुन तिचे फोटो पाहण्याची इच्छाही  नसल्याचे म्हटले आहे. मुलीचे फोटो दाखवणे हा त्यांचा कौटुंबिक निर्णय आहे.  त्यामुळे तिचे फोटो व्हिडिओ पाहण्यात कोणालाही रस नसल्याच्या या कमेंट्स आहेत. त्यामुळे विरुष्काच्या मुलीबद्दल तशी काही लोकांमध्ये उत्सुकता दिसून आलेली नाही. 

या आधीही फोटो काढण्याच्या दिल्या सूचना

सौजन्य: Instagram

एका क्रिकेट मॅचदरम्यान अनुष्कासोबत वामिका स्पॉट झाली होती. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तिने हे फोटो काढून टाकण्याची विनंती सगळ्यांना केली होती. त्यानंतर वामिकाचे फोटो कुठेही दिसले नाहीत. आताही वामिकाचा फोटो कुठेही जाऊ नये यासाठी तिने फोटोग्राफर्सवर नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर  विरुष्काचे फोटो काढतानाही तिचा राग हा अनावर होता. ती पटकन गाडीकडे जाताना दिसली. तिचे हे वागणे अनेकांना खटकले असावे असेच काहीसे दिसत आहे. 

चित्रपटांवर बंदी घाला

अनुष्काला असे वागणे खूपच महागाचे ठरेल असे लोकांच्या कमेंटवरुन दिसत आहे. अनुष्का एक सेलिब्रिटी आहे तिचे फोटो काढले जाणे अगदी स्वाभाविक आहे. पण चांगल्या शब्दात तिने हे सांगणे गरजेचे होते असे अनेकांचे म्हणणे होते. इतकेच नाही तर तिच्या आगामी चित्रपटासाठी तिला याच लोकांची गरज प्रसिद्धीसाठी लागेल तेव्हा ती काय करेल? असा सवाल देखील अनेकांनी केला आहे. तिच्या चित्रपटादरम्यान तिला ही प्रसिद्धीच मिळू नये असे मत अनेक नेटीझन्सनी व्यक्त केले आहे. 

अनुष्काचे हे वागणे अनुष्काला नक्कीच महागात पडणार आहे. तुम्हाला काय वाटते. 

अधिक वाचा

आदिपुरुषच्या टीझरवर सेलिब्सच्या संतप्त प्रतिक्रिया

FIFA वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेही करणार परफॉर्मन्स, जेनिफर आणि शकीरानंतर नोराला मान

Leave a Comment