सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत, पहिला लुक समोर

सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. पण आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या नव्या भूमिकेसाठी. सुष्मिता सेनने आर्या ही वेबसिरीज केली आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचे आणि रसिकांचे मन जिंकून घेतले. ओटीटीवर आर्याद्वारे सुष्मिताने पदार्पण केले. तर आता दुसरी वेबसिरीज घेऊन सुष्मिता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. सुष्मिता सेनची ही वेबसिरीज ट्रान्सजेंडर (Transgender) कार्यकर्ता असणाऱ्या गौरी सावंत (Gauri Sawant) वर आधारित आहे. या सिरीजमधअये सुष्मिता मुख्य भूमिका करत असून गौरीची भूमिका साकारणार आहे. या वेबसिरीजचा पहिला लुक सुष्मिताने आपल्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा लुक समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे. 

‘ताली’ वेबसिरीजमध्ये सुष्मिता

सुष्मिता सेनने आपल्या या वेबसिरीजचा पहिला लुक प्रदर्शित केला आहे. तर हा फोटो अपलोड करून कॅप्शनमध्ये सुष्मिताने लिहिले की, ‘Taali – बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी!’. या फोटोला अनेकांनी शुभेच्छा देत तिच्या या प्रवासासाठी अभिनंदन केले आहे. तर अनेकांनी सुष्मिता सेनला मनापासून अभिनंदन शुभेच्छा देत तिचा गर्व असल्याचे सांगितले आहे. याशिवाय आपण या मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तीचा अभिनय करताना आपल्याला अत्यंत अभिमान वाटत असल्याचे आणि अतिशय आनंद होत असल्याचेही तिने या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. गौरी सावंतच्या बायोपिकसाठी सुष्मिताला विचारण्यात आल्यानंतर तिला ही स्क्रिप्ट फारच आवडली आणि तिने त्वरीत होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. ताली या वेबसिरीजमध्ये एकूण 6 भाग असणार आहेत. गौरीच्या आयुष्यातील सर्व घडामोडी या अत्यंत बारकाईने दाखविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. गौरी सावंत ही भारतातील सर्वात पहिली ट्रान्सजेंडर आई नक्की कशी बनली याबाबत सर्व काही या वेबसिरीजमध्ये दाखविण्यात येणार आहे. 

कोण आहे गौरी सावंत (Gauri Sawant)

गौरी सावंत नक्की कोण आहे? तर गौरी सावंत ही ट्रान्सजेंडर असून सखी चार चौघी ट्रस्टची संस्थापक आणि निर्देशक आहे. या संस्थेतून गौरी सुरक्षित सेक्ससाठी प्रयत्न करते आणि ट्रान्सजेंडर यांना मार्गदर्शन करते. याशिवाय गौरी ही भारतातील पहिली ट्रान्सजेंडर आई आहे. तिने नेहमी याविषयी आवाज उठवला आहे आणि आपली मतं बिनधास्तपणे मांडली आहेत. गौरीने अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी मदत केली आहे. 

या वेबसिरीजचे काम सुरू झाले असून याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) करणार आहे. तर ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट आणि मीडिया सॉल्युशन्सच्या बॅनरन्वये अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी देखील निर्देशन करणार आहेत.  रवी जाधव हे नाव दिग्दर्शन क्षेत्रात मोठं आहे आणि त्यामुळेच या वेबसिरीजमध्ये काय वेगळेपणा दिसून येणार यासाठी आता प्रेक्षक आणि सुष्मिताचे चाहते अतिशय उत्सुक आहेत. याशिवाय सुष्मिता ही भूमिका कशी साकारणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Leave a Comment