पैठणी साडीची परंपरा जपणारा ‘31 वा न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हल’

पैठणी (Paithani) हे महाराष्ट्र चे महावस्त्र गेल्या अनेक वर्षांपासून  लोकप्रियतेच्या लाटेवर आहे. साडी प्रेमी नेहमीच बाजारातील सर्वोत्तम पैठणीच्या शोधात असतात. येवले हे पैठणी चे माहेरघर आहे परंतु पेंडेमिकच्या काळात ह्याच माहेरवाशिणीला  मदत मिळणे मुश्कील झाले होते. त्याचा परिणाम येवल्यातील विणकरांच्या व्यापारावरच नव्हे तर उपजीविकेवर झाला. वर्षानुवर्षे उत्पादन केंद्र असलेल्या येवला शहराचा व्यापार ठप्प झाला.आणि म्हणूनच अस्सल पैठणी साडी ग्राहकांनपर्यंत पोचवण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीनंतर पैठणीची वैभवशाली परंपरा साजरी करण्याचे वचन जपत 31 व्या ”न्यू ‘वेव्ह पैठणी फेस्टिव्हल” ला सुरुवात होत आहे.

प्रदर्शनाला सुरूवात 

1989 साली सरोज धनंजय यांनी पैठणीचे माहेरघर असलेल्या येवला येथून अस्सल हातमागावर विणकाम केलेल्या पैठणी साड्या मुंबईत आणून एक वार्षिक प्रदर्शन भरवले होते तेव्हा पासून ह्या पैठणी प्रदर्शनाला सुरुवात झाली. सर्वात जुन्या आणि प्रख्यात अश्या 31 वे ”न्यू वेव्ह पैठणी फेस्टिवल” (31st New Wave Paithani Festival) यावर्षी दिनांक 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे सुरू राहणार आहे. फेस्टिवल मध्ये ग्राहकांना 100 वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या पाहायला मिळतील. ह्या सगळ्या पैठण्या अस्सल दर्जाच्या असून त्यांची किंमत 15 हजार पासून ते 3.5 लाख पर्यंत असणार आहे. 

न्यू वेव्ह पैठणीच्या दिग्दर्शिका सन्निधा भिडे यांनी सांगितले की, ‘कोविड-19 चा प्रादुर्भाव झाल्यापासून हातमाग विणकरांना मोठ्या प्रमाणावर कामाचे नुकसान झाले आणि बहुतेक विणकरांना त्यांचे काम बदलावे लागल्यामुळे  येवला विभागातील अस्सल पैठणी साडीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या सणासुदीच्या हंगामात आम्ही पुन्हा वार्षिक बाजाराची परंपरा पुढे चालू ठेवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. यावर्षी, येवला विणकरांच्या मदतीने आम्ही विणकर कुटुंबांना ‘न्यू वेव्ह पैठणी बेस्पोक’ ची संकल्पना मांडत आहेत. जी वर्षभर लाभ देणारी असेल. जेणेकरून  ग्राहकांना आता कस्टमाइज पैठणी साड्यांची निवड करता येईल. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार रंग, नक्षीकाम, इतर सगळ्याची निवड करून फेस्टिवल दरम्यान मागणी नोंदवता येईल.

40 विविध विणकर एकत्र

यावर्षी लग्नसराई ,दिवाळी, नवीन ट्रेंड या सगळ्या गोष्ठी लक्ष्यात ठेवून ‘न्यू वेव्ह शॉपिंग फेस्टिव्हल’ अंतर्गत देशभरातील 40 विविध विणकरांना एकत्र घेऊन चंदेरी, माहेश्वरी, जामदनी, बनारसी, कांथा, कोसा, साउथ सिल्क, राजस्थानमधील रिअल  कोटा डोरिया साड्या, पश्चिम बंगालमधील बलूचारी साड्या यासारख्या विविध हातमागावरील साड्या उपलब्ध केल्या आहेत. राजस्थानी रजया, काश्मीरमधील रिअल पश्मिना शॉल्स , साऊथचे दागिने आणि बरेच काही. पैठणी जॅकेट, पुणेरी पगडी, आकाशकंदील, मोजडी अश्या पैठणी मटेरिअलपासून बनवलेल्या अनेक वैविध्यपूर्ण वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत. डिझायनर साड्या आणि ब्लाउज, ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने हेही आकर्षण असेल. लक्ष्य आर्ट फाऊंडेशन आणि आधार सारख्या एनजीओना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी मोफत स्टॉल दिले जातील.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अस्सल पैठणी साडीला चालना देणे आणि येवला विणकरांच्या कौशल्यांना पुनरुज्जीवित करणे हा आहे. पैठणीच्या निर्मितीला सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत काहीही लागू शकतो, ते संपूर्णतहा डिझाईनवर अवलंबून आहे. यासाठी केवळ कुशल कामगारांचीच गरज नाही  तर साथ आणि कौशल्याची देखील आवश्यकता असते. ग्राहक बेंगळुरू आणि इतर दक्षिणेकडील बाजारपेठेतील मूळ आणि बनावट पैठणी यात फरक कसा ओळखू शकतात हे जनतेला समजावे अशी आमची इच्छा आहे” न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलमधील सन्निधा भिडे हा यांचा मुख्य हेतू आहे.

महागड्या पैठणी साड्यांची अशी घ्यावी काळजी

ब्लाऊज झाला असेल ढगळ, तर वापरा सोप्या टिप्स

तुमच्या वॉर्डरोबमध्ये या साड्या असायलाच हव्यात

Leave a Comment