Bigg Boss 16| साजिदवर घेतला अनेक महिला सेलिब्रिटींनी आक्षेप

Bigg Boss 14 च्या घरात आता कुठे घाडामोडी व्हायला सुरुवात झाली आहे. भांड्याला भांड लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या घरातील साजिद खान मात्र आल्यादिवसापासून वेगवेगळ्या कारणाने ट्रोल होत आहे. घरातील स्पर्धकांसाठी ते एक मोठं व्यक्तिमत्व असलं तरी देखील MeToo दरम्यान साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप लावले होते. असे असतानाही एवढ्या मोठ्या रिॲलिटी शोसाठी साजिद खानला का आमंत्रित करण्यात आले हा राग अनेक सेलिब्सना आहे. अनेक जणींनी साजिदविरोधात पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे तर काहींनी साजिदला पाठिंबा दिला आहे. दरम्यान हे सगळे प्रकरण एकण काय जाणून घेऊया. 

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

साजिदला आहे इमेज बदलण्याची गरज

साजिद खानवर मधल्या काळात अनेक आरोप लागले होते.  त्यातील लैगिंक शोषण हा आरोप सगळ्यात मोठा आणि त्याच्या इमेजला एकाच दिवशी तडा देणारा होता. साजिदने आतापर्यंत केलेल्या कामगिरीपेक्षाही अधिक त्याने जे केले त्याचा राग अनेकांना होता. त्यावेळी अनेक मॉडेल्सनी पुढे येऊन साजिदने केलेल्या वाईट कृत्याचा पाढा वाचून दाखवला होता. त्यानंतर साजिदच्या चित्रपटांवर त्याचा परिणाम होऊ लागला. चांगली स्टारकास्ट असूनही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नव्हते. त्यामुळे त्यातून बाहेर पडत साजिद खान खऱ्या आयुष्यात कोण आहे हे दाखवण्यासाठी साजिद खान आला आहे. त्याने ही गोष्ट त्याच्या प्रवेशादरम्यानच सांगितली. शिवाय त्याच्याकडून झालेल्या काही चुकाही तो या पुढे जाऊन टाळणार असल्याचे वचन त्याने सलमानला दिले आहे. 

साजिद होतोय इन्टटेनर

साजिद खान घरात आल्यापासून त्याची एक वेगळी इमेज तयार करतोय. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात तो कुठेही कमी पडत नाही. इतकेच नाही तर त्याची घरात अनेकांशी मैत्री झाली आहे. चांगल कोण आणि वाईट कोण? याची ओळख त्याला असल्यामुळे त्याचा खेळही त्याच दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे. ज्याचा फायदा त्याला नक्कीच या खेळात टिकण्यासाठी होणार आहे. 

शिव- अब्दू- साजिदची टीम

घरात साजिदला मान असला तरी देखील त्याच्यासोबत तसं फार कोणी बोलताना दिसत नाही. पण त्यातल्या त्यात घरात एमसी स्टैन, शिव ठाकरे आणि अब्दू यांची एक टीम झालेली दिसत आहे. साजिद  त्यांच्यासोबत चर्चा करताना दिसतो. पण त्याच्या मागे घडलेल्या कोणत्याही घटनांचा अद्याप उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ज्यांना साजिद त्याच्या लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपासंदर्भात अजूनही काही बोलला नाही. पण पुढील काळात तो याचा खुलासा करेल अशी अपेक्षा आहे. 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

अनेक सेलिब्रिटींनी घेतली बाजू

 साजिदचा भूतकाळ काहीही असला तरी त्याला त्याचे म्हणणे मांडण्याची एक संधी मिळायलाच हवी असे अनेकांना वाटते. म्हणूनच अनेक सेलिब्रिटी त्याच्या समर्थनार्थ उभे आहेत. एके ठिकाणी त्याला काढण्याची मागणी होत असताना त्याला घरात राहण्याचा अधिकार असल्याची भूमिकाही अनेकांनी घेतली आहे. 

साजिद खानचे(Sajid Khan)  या घरात असणे तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य नक्की कळवा. 

Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

Leave a Comment