अभिनेत्री संस्कृती बालगुडे झाली ‘बेभान’

मिस्टर वर्ल्ड (Mister World) ठाकूर अनुप सिंगचा (Thakur Anoop Singh) मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची (Sanskruti Balgude) एंट्री झाली आहे. संस्कृती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात “बेभान” प्रदर्शित होत आहे.  शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत, अनुप जगदाळे दिग्दर्शित “बेभान” 11नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मधुकर ( अण्णा ) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ (Bebhan) हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे यांच्याच आगामी ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटाचीही चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता आहे. 

पोस्टर झाले प्रदर्शित 

दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेल्या बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे.  चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी जबाबदारी निभावली आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ठाकूर अनुपसिंग मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंगनं बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande), संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर (Smita Jaykar) आणि अभिनेते संजय खापरे (Sanjay Khapre) यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्मिता जयकर यांना अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटात आईची भूमिका करून स्मिता जयकर यांनी नाव कमावले. पण गेले काही वर्ष त्यांना मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमीच आहे. 

रोमँटिक चित्रपट असल्याचा अंदाज 

चित्रपटाच्या पोस्टरवरून बेभान हा रोमॅंटिक चित्रपट असल्याचा अंदाज बांधता येतो. मात्र अभिनेता  ठाकूर अनुपसिंग असल्यानं चित्रपटात धमाकेदार अॅक्शनही पहायला मिळेल का, याची उत्सुकता आहे. तसंच मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे या अभिनेत्री चित्रपटात असल्यानं ही प्रेमत्रिकोणाची गोष्ट आहे, की आणखी काही वेगळं पहायला मिळेल याची उत्तरं काहीच दिवसांत मिळतील. येत्या 11 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. याशिवाय अनुपसिंग ठाकूरचा हा पहिलाच चित्रपट असून यामध्ये त्याची भूमिका कशी असेल आणि तो पडद्यावर कसे काम करेल याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर संस्कृती बालगुडेने मालिकांपासून आपली सुरूवात केली आणि अनेक चित्रपटांमधून तिने काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असते. अनुप आणि संस्कृतीची जोडी पडद्यावर काय कमाल करणार हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर या चित्रपटाचा विषय नेमका काय आहे आणि मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट कसा खेचून आणेल याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत, पहिला लुक समोर

‘हवाहवाई’तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा

दिवाळीत सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण, टीझर प्रदर्शित

Leave a Comment