Bigg Boss 16 |  शुक्रवारचा वार पडला स्पर्धकांवर भारी

Bigg Boss सुरु झाल्यानंतर विकेंडचा वार कधी येतो याची वाट अनेक जण पाहत असतात. कारण या दिवशी सलमान कोणाची बँड वाजवणार हे पाहणे महत्वाचे असते.या घरात जाऊन स्पर्धकांना आता आठवडा झाला आहे. या घरात काहींची टीम होताना दिसत आहे तर काही जणांना एकटे पाडलेले दिसत आहे. अशावेळी डोस देण्यासाठी सलमानला येणे गरजेचे असते. असाच होता या सीझनचा पहिला शुक्रवार का वार…. नेमकं काय घडलं शुक्रवारी चला घेऊया जाणून

अधिक वाचा : Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

अनेक स्पर्धकांना केलेय सावध

पहिला आठवडा हा स्पर्धकांसाठी नेहमीच गोंधळात टाकणारा असतो. पण इतके सीझन झाल्यामुळे खूप जण अगदी सुरुवातीपासून आपला गेम दाखवायला सुरुवात करतात. असे करताना अनेकदा चुकीची पर्सनॅलिटी ही दिसू लागते. असाच इशारा काही स्पर्धकांना सलमानने दिला आहे. शुक्रवारच्या वारमध्ये सलमान खास स्पर्धकांना भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने स्पर्धकांशी संवाद साधला. त्यासोबतच आज त्याने खास स्पर्धकांना पार्टीदेखील दिली. पण त्यामध्येही एक ट्विस्ट देण्यात आला होता. अब्दूला सलमानने निवडल्यानंतर त्याला पुढील स्पर्धकाला निवडायचे होते. एक एक करत मेज सजली यामध्ये दोन गट दिसून आले. शालिन, सुम्बुल, गौतम, निमृत, टीना असा एक दिसून आला तर दुसऱ्या बाजूला शिव, स्टैन, साजिद असा गट दिसून आला. त्यामुळे साधारणपणे पुढे या गेममध्ये नक्कीच या दोन गटातील शाब्दिक चकमक पाहायला मिळणार आहे.  या पार्टीदरम्यान सलमानने काही स्पर्धकांची कानउघडणी केली आहे तर काहींना हिंट देखील दिली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी नाही तर शनिवारी तरी कोणाची कानउघडणी होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मान्याला आहे नीट बोलण्याची गरज

घरात मिस इंडिया रनरअप मान्या सिंग सध्या अनेक बाबतीत चुकीच्या ट्रॅकवर जाताना दिसत आहे. प्रसिद्धीत राहण्यासाठी ती सतत स्वत:ला फार मेहनती आणि इतरांना फार कमी लेखत आहे. सलमान ज्यावेळी घरात आला त्यावेळी तिला आणि श्रीजिताला पार्टीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे घरात त्यांच्यात काही क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. पण ते भांडण मान्याने जरा अधिकच चुकीच्या पद्धतीने नेलेले दिसत आहे. ती श्रीजिताला जे म्हणाली त्यावरुन ती वादात सापडणार आहे त्यात काही शंका नाही. मान्याने श्रीजिताला ‘’तू कोणीही नाही केवळ अभिनेत्री आहे, मी मिस इंडिया आहे’’ हे असे एकदा नाही तर तिने दोनदा म्हटल्यामुळे तिला सलमान झापेल यात काहीही शंका नाही. 

शिवकडेही सलमानचे लक्ष

सीझनमध्ये सगळ्यात जास्त लक्ष जर कोणाकडे आहे तर ते शिव ठाकरेकडे. मराठी बिग बॉसचा विजेता असल्यामुळे त्याला घरात अनेक जण टार्गेट करताना दिसत आहे. एका सीझनचा विजेता असूनही शिवला या नव्या खेळाडूंसोबत खेळताना थोडा विचार करावा लागणार आहे. सलमानचे लक्ष शिववर आहे हे दिसून येत आहे. शिव चांगला खेळतो असे त्याने अगदी आवर्जून सांगितले. पण सोबतच त्याला त्याचा मुद्दा मांडताना जमावाला घाबरण्याची गरज नाही. दबून जाऊ नको असा सल्ला देखील दिला आहे. 

त्यामुळे एकूणच मिक्स असा हा शुक्रवारचा वार होता. आता शनिवारी नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

अधिक वाचा : Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

Leave a Comment