मुंबईची माऊलीच्या दरबारात कृष्ण लीला 

आजपासून मुंबईसह देशभरात सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्व देवी भक्तांनी आपल्या देवीची पूजा-अर्चनेला सुरुवात केली. गणेशोत्सव प्रमाणे नवत्रोत्सवसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध मुंबईची माऊली या मंडळाने देखील नुकतेच आपल्या माऊलीच्या मूर्तीचे भव्य दिव्य आगमन सोहळा पार पाडला. दार वर्षी आपल्या विविध देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यंदा कृष्णलीलाचा देखावा सादर केला आहे. 

प्रतीक्षानगर देखावा

सायन प्रतीक्षा नगर येथे प्रसिद्ध असलेल्या मुंबईची माऊली हे मंडळ दर वर्षी आपल्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या अगोदर या मंडळाने केदारनाथ मंदिराचा देखावा, तेलंगणा  येथील नरसिंह मंदिर,रामायणातील प्रभू श्री रामाचा वनवास , मुंबईकरांसाठी सामाजिक संदेश देणारा देखावा या मंडळाने साकार केला आहे. 
२००० साली धार्मिक भावनेतून मंडळाची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून आज पर्यंत मंडळातील सर्व युवा कार्यकर्ते या मंडळाचा व्यवस्थापन करत आहे.२०१५ साली रुद्रमा देवीच्या अवतारातील मूर्ती मंडळाच्या वतीने साकारण्यात आली,  ही मूर्ती घडविण्याचे संपूर्ण काम मूर्तिकार विजय खातू यांनी केले होते. तर यंदाच्या वर्षी मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी ही मूर्ती साकारली आहे.  

यंदा कालिया मर्दन 

आपल्या आगमनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची आगमन मिरवणूक तब्बल १२ तास चालते. दरवर्षी आपल्या विविध व विलोभनीय स्वरूपासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या माऊलीच्या प्रभावळमध्ये कालिया मर्दनचा देखावा साकारण्यात आला आहे. तर देवीच्या गाभाऱ्यात श्री कृष्णालीलातील काही क्षण चलचित्र आणि चित्रांच्या माध्यमातून साकारण्यात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अविनाश किरवे यांनी सांगितले.

Leave a Comment