ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दांडिया

आजपासून शारदीय नवरात्रौत्सव धूमधडाक्यात सुरू झालाय. रंगाची उधळण आणि दांडिया हे नेहमीच नवरात्रीचे आकर्षण ठरले आहे आणि यामध्ये राजकारणी तरी मागे कसे राहतील? 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर रोजी ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अभ्युदय नगर काळाचौकी या मुंबईच्या भागात भाजपने दांडिया महोत्सव आयोजित केला आहे.

उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा असे म्हणत शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यावरून पुढे ठाकरे सेना काय प्रतिक्रिया देणार अथवा पाऊल उचलणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.

महोत्सवाचा आनंद घेण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. तर शुक्रवारी 19 ऑक्टोबरपासून हा दांडिया महोत्सव सुरू होणार असून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी या दांडियाला सुररस्टार रणवीर सिंह ने लावली होती हजेरी , यावर्षीच्या दांडाला नक्की कोणता सुपरस्टार येणार याओके बद्दल उत्सुकता आहे.

Leave a Comment