Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

बिग बॉस (Bigg Boss 16) हा असा रियालिटी शो आहे जिथे सतत काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होतच असते. मराठी बिग बॉस सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या हिंदी बिग बॉसच्या या सीझनमध्ये खेळत आहे. मात्र पहिल्याच आठवड्यात शिवला अनेक वेळा मुद्दाम टार्गेट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शिवविरूद्ध भडकवणे अथवा शिवला वेगळे पाडणे असे अनेक डाव इतर खेळाडू करताना दिसून येत आहेत. ही गोष्ट शिवच्या देखील लक्षात आल्याचे त्याच्या बोलण्यातून दिसून आले आहे. या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी शिवला नॉमिनेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिव नक्की काय करणार आणि कशा पद्धतीने खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

https://dazzlemarathi.com/2022/10/06/bigg-boss-marathi-4-apurva-nemlekar-prasad-jawade-fight-in-marathi/

अनेक जण शिवच्या विरोधात 

अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) आणि शिवमध्ये झालेले भांडण हे नाहक असल्याच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटत आहेत. खरं तर शिवने गरज नसतानाही माफी मागून विषय संपवायचा प्रयत्न केल्यानंतरही सौंदर्याने ही गोष्ट उगीचच ताणली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय टास्कमध्ये शिवला अनेकदा मुद्दाम टार्गेट करत असल्याचेही दिसून येत आहे. अब्दुचा (Abu Rozik) मॅनेजर म्हणून शिवला देण्यात आलेल्या टास्कमध्ये शिवने अत्यंत चांगली कामगिरी केली असतानाही जास्त मतं ही एम सी स्टॅनची (M C Stan) मॅनेजर सुंबुल (Sumbul Touqeer) हिला घरातल्या सदस्यांनी देण्यात आल्याचे दिसून आले. यानंतरच शिवने आपल्याला एकटं पाडत असल्याचे साजिद खान (Sajid Khan) याला बोलूनही दाखवले. मात्र मराठीतील विजेता असल्याने शिवला एका वेगळ्या पातळीवर बघितलं जात आहे. 

https://dazzlemarathi.com/2022/10/06/actress-sushmita-sen-share-first-look-as-transgender-activist-gauri-sawant-from-new-web-series-taali-in-marathi/

शिव उत्तम खेळाडू

शिव ठाकरे मराठीतील विजेता आहे म्हणूनच नाही तर हिंदीमध्येदेखील तो प्रत्येक टास्क उत्तम खेळत आहे आणि इतरांमध्ये मिळून मिसळून वागत आहे. मात्र तरीही एक गट बनवून त्याला वेगळं करण्यात येत असल्याचे सतत दिसून येत आहे. त्यामुळे शिव आता आपला गेम कसा बदलेल आणि कशा पद्धतीने खेळेल याकडे पाहणं गरजेचे आहे. एका ठिकाणी तर त्याच्याविरूद्ध एम सी स्टॅनला भडकविण्यात आले. पण एम सी स्टॅनकडून सगळा राग ऐकून घेतल्यानंतरही शिवने अत्यंत शांत राहात आपला चांगुलपणा दाखवून दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या आठवड्यात शिवचे चाहते आणि प्रेक्षक शिवला नॉमिनेशनपासून वाचवतील का आणि त्याला बाहेर काढणार नाहीत ना? हेदेखील पाहावे लागेल. शिवला आतापर्यंत रियालिटी शो चा अनुभव आहे. तसंच शिव नेहमीच चांगला वागत आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद द्यायला हवा अशीही आता सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. बिग बॉसमध्ये मराठी खेळाडूंना नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो असं दिसून आलं असलं तरीही आतापर्यंत राहुल वैद्य (Rahul Vaidya), तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) यासारख्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर शेवटपर्यंत मजल मारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिव ठाकरेदेखील खेळाच्या जोरावरच पुढे जाईल हे नक्की असा विश्वास त्याच्या चाहत्यांना नक्कीच आहे!

https://dazzlemarathi.com/2022/10/05/hawahawai-to-release-on-7-th-october-in-marathi/

Leave a Comment