भक्तांच्या ओढीने ती आली गोंधळाला

धवल सोलंकी

गणेश विसर्जनानंतर आता मुंबईकरांना आतुरता लागली आहे ती म्हणजे आपल्या आई माऊलीच्या आगमनाची. आजपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील अनेक नामंकित मंडळांनी लालबाग परळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि अत्यंत भक्तमय वातावरणात मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या देवीची मूर्ती कार्यशाळेतून मंडपात घेऊन आले आहेत.

अंबे माते की जय या जयघोषात मुंबईतील सर्वच नवरात्रौत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या माऊलीची मूर्ती मंडपात घेऊन गेले. मूर्तिकार रमेश रावले, सिद्धेश दिघोळे, रेश्मा खातू, सतीश वळिवडेकर यांच्या कार्यशाळेतून देवीच्या  विविध रूपातील मनमोहक आणि भव्य दिव्य स्वरूप पाहण्यासाठी  भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. दगडी चाळीची देवी, आर्थर रोडची आई संतोषी माता, फोर्टची आई ईच्छादेवी माँ या सारख्या अनेक नामांकित मंडळांनी आपल्या देवीचा आगमन सोहळा आज पाडला.

देवीला सोन्याचे मुकुट अर्पण
मुंबईतील प्रसिद्ध सात रस्त्याची माऊली या नावाने प्रसिद्ध असलेल्या .बाल गोपाळ नवरात्रोत्सव मंडळाने यंदा आपल्या देवीसाठी सोन्याचे मुकुट अर्पण केले. मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांनी या मंडळाची देवीची मूर्ती साकारली असून, मुंबईतील अनेक भाविक आणि फोटोग्राफर्सनी या देवीचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी पाहायला मिळाला.

केदारनाथच्या मंदिरात आईचे आगमन
मुंबाबतील अँटोप हिलची नवदुर्गा मंडळाने तर चक्क केदारनाथ मंदारचा देखावा उभा करत आपल्या देवीसाज्या मूर्तीला या मंदिरात विराजमान करत आगमन सोहळा पार पाडला. ढोल ताशांच्या गजरात लहान थोरांच्या साक्षीने हा संपूर्ण सोहळा पार पाडला.

Leave a Comment