पहिल्या आठवड्याची चावडी झाली मुळमुळीत, प्रेक्षक नाराज

बिग बॉस मराठीच्या 4 थ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi S4) पहिला आठवडा चांगलाच गाजला. अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांच्या भांडणाने आणि किरण माने (Kiran Mane) आणि विकास सावंत (Vikas Sawant) यांच्या काहीही न करण्यामुळे पहिल्याच चावडीवर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची चांगलीच शाळा घेणार असा प्रेक्षकांचा अंदाज होता. काही अंशी किरण माने आणि विकासच्या बाबतीत हे खरं झालं असलं तरीही अपूर्वा नेमळेकरला फारच कमी दट्ट्या बसला असं प्रेक्षकांना दिसून आलं आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियावर याची तुफान चर्चा सुरू झाली आहे. फेसबुकवर असणाऱ्या बिग बॉसच्या अनेक ग्रुपमधील सभासदांना चावडी मुळमुळीत झाल्याचे वाटत आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याच्या चावडीने प्रेक्षकांना नाराज केल्याचे दिसून येत आहे. 

महेश मांजरेकरांची शाळा 

बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात महेश मांजरेकर शनिवार आणि रविवार चावडीवर येऊन प्रत्येक स्पर्धकाची योग्य ती शाळा घेतात. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात अपूर्वा नेमळेकरला अधिक ओरडा मिळेल अशी आशा प्रेक्षकांची होती. मात्र महेश मांजरेकर यांनी निखिल राजेशिर्के (Nikhil Rajeshirke), किरण माने, यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar), विकास सावंत यांची अधिक शाळा घेतल्याचे दिसून आले. तर अपूर्वाच्या बाबतीत शाळा घेताना महेश मांजरेकरांनी सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून आल्याचे प्रेक्षकांचे मत आहे. याशिवाय प्रसाद अत्यंत चांगला खेळूनही अनेकदा त्याला चावडीवर बोलूच देण्यात आले नाही असंही अनेकांनी मत मांडले आहे. त्यामुळे यावेळी पहिलीच चावडी अत्यंत मुळमुळीत झाल्याचे प्रेक्षकांना वाटत असल्याचे आता समोर आले आहे. 

अपूर्वाला बोलण्याची संधी मात्र प्रसादला नाही 

आरोप केल्यानंतर अपूर्वाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली मात्र प्रसादच्या बाबतीत असं झालं नाही. त्याने बोलायला सुरूवात केल्यानंतर महेश मांजरेकर सतत त्याला उलटसुलट प्रश्न विचारून टोकत होते असं दिसून आलं. ओरडायचं होतं तर दोघांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी होती असं अनेकांचं म्हणणं आहे. प्रसादला त्याची बाजू मांडूच दिली गेली नाही असंच चित्र यावेळी दिसून येत होतं. त्याशिवाय अपूर्वाला ओरडल्यानंतर उगीचच तिचं मुळूमुळू रडणं दिसून आलं असंही अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींच्या मते अपूर्वा आणि प्रसाद दोघेही चुकीचे होते. मात्र अपूर्वाने प्रसादला टार्गेट केल्यानंतरच त्याने असं वागायला सुरुवात केली हेच सर्वांसमोर आल्याचे दिसून आले आहे. प्रसाद अत्यंत उत्तम खेळाडू असून त्याने कामात आणि खेळात दोन्हीकडे आपले 100 टक्के दिल्याचेही प्रेक्षकांना दिसून आले आहे. 

त्यामुळे आता या नव्या आठवड्यात समीकरणं बदलणार की तशीच राहणार आणि चावडीवर घेतल्या गेलेल्या शाळेनंतर आता कोणता स्पर्धक नक्की कसा वागणार अथवा आपल्या वागण्यात काही बदल करणार का? हे आता येणारा काळच ठरवेल. पण पुढच्या चावडीवर चुकीचं वागणाऱ्या स्पर्धकाला योग्य दट्ट्या मिळेल अशीच अपेक्षा प्रेक्षक करत आहेत.

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

Bigg Boss Marathi 4: घरात पैशांचा पाऊस आणि समृद्धी जाधव पहिली कॅप्टन, कोण आहे समृद्धी

Bigg Boss 16: मराठमोळ्या शिव ठाकरेला केलं जात आहे टार्गेट

Leave a Comment