सांगलीतील बहुजन समाज्याच्या ‘दसरा मेळाव्यात’ गोपीचंद पडळकरांनी केले प्रबोधन

मुंबई: दरवर्षीप्रमाणे, यंदाही सांगलीच्या श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी, येथे २२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी महाराष्ट्रातील समस्त बहुजन समाजाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत शितोळे, स्व.गणपत आबा देशमुख यांचे नातू अभिषेक देशमुख आदि मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

विशेष म्हणजे या दसऱ्या मेळाव्याला, महाराष्ट्रातील बहुजन अठरापगड धनगर समाजाचे नेते व विधान परिषद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी धनगर आरक्षण व महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थीतीवर बहुजन समाजातील बांधवांचे प्रबोधन केले.

आपल्या भाषणाद्वारे उपस्थितांना संबोधताना गोपीचंद पडळकर म्हणाले,

> मागील पंधरा दिवसांआधी जेंव्हा मी धनगर जागर यात्रा घोषीत केली तेंव्हा पासून आपल्यात कशी फुट पाडतां येईल याचे सर्व प्रयत्न एक महाराष्ट्रातला लांडगा करतोय.

> काही लोक आपला आरक्षणाचा विरोध करतात परंतु त्यांना मुळात डॉ. आंबेडकरांनी आधीच आम्हाला आरक्षण दिलेले आहे. आता त्याची फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे.

> हा लांडगा किती बहुजन विरोधी आहे, हे यावरूनच सिद्ध होते की, बंड केले पुतण्याने काकाच्या विरोधात पण टार्गेट व शिव्याशाप दिले जातायेत छनग भुजबळांना. का? कारण ते माळी समाजातील आहेत म्हणून का? आधी त्यांनी उभारलेली समता परिषदेवर संपवण्याचा प्रयत्न केला.

> संघर्षयोद्धा मुंडे साहेबही हे मुख्यमंत्री पदाच्या एकदम जवळ असताना याने कट कारस्थान करून एक आमदार पळवण्यास सर्वात मोठी भूमिका याची होती. नाहीतर त्याचवेळेस वंजारी समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता. नंतर बी. के कोकरे साहेबांनी उभारलेली चळवळ याने संपवली. म्हणजे काय बहुजनांचं नेतृत्व मोठं होऊ द्यायचंच नाही याला.

> बी,के कोकरेंनी यशवंत सेनेची स्थापन पवारांच्या विरोधात लढण्यासाठी स्थापन केली होती. ती बी के कोकरेची यशवंत सेना पवारांच्या सांगण्यावरून पावले उचलतेय. याचे मला अतिशय दुख वाटतेय, वेदना होतेय..आपल्या लोकांना हे केंव्हा समजेल की आपला वापर आपल्याच समाजात फुट पाडण्यासाठी होतोय. याची जाणीव यांना व्हावी हीच प्रार्थना श्री खंडोबा बिरोबाच्या चरणी करतो.

> आजच्या राजकीय परिस्थिती आपल्याला सर्व मायनर ओबीसींना सोबत घेऊन, भटक्या वंचितांना सोबत घेऊन एका मोठ्या भावाची भूमिका घ्यावी लागेल तरच आपण राजकारणात यशस्वी होऊ. सर्व छोटे समाज आपल्याकडे आशेनं पाहत आहेत. त्यांना गावगाड्यात धनगरांचा आधार वाटतो. कारण आपण कुणावर अन्याय करत नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढतो. जिथं गरज पडले तिथे बाळूमामा झालं पाहिजे अन जिथे अन्याय होईल तिथे बापूभिरू झालं पाहिजे.

म्हणूनच मी सर्व बहुजनांना एकत्रित करण्यासाठी हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची मी स्थापना करत आहेत.
या संपूर्ण सृष्टीचा निर्माता शिव महादेव आहे, प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीत शिवाचाच अंश आहे. स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी पहिला रक्ताभिषेक छत्रपतींनी शिव महादेवालाच केला होता. त्यामुळे आता हा सर्व बहुजनांना जोडणारा शिवमल्हारीचा धागा बांधून भारतीय शिवमल्हार सेनेची मी स्थापना करत आहे.

जिथे जिथे अत्याचार होईल, अन्याय होईल तिथ तिथं शिवमल्हार क्रांती सेना धावून जाईल.

सरकाराने हे लक्षात ठेवावे तुमच्याकडे वेळ कमी आहे, चाळीस दिवस होत आले आहेत. साठ दिवासाचा कालावधी तुम्ही मागितला होता. वेळ निघत चालली आहे.

> तसेच मी समस्त धनगर बांधवाना आवाहन करतो. धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. न्यायालयातील लढाई आपल्याला जिंकावे लागेल पण तसेच सरकारवर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. सरकार सोबतच्या बैठकीनंतर ६० दिवस पुर्ण होऊनही काही कारवाई झाली नाहीतर येत्या २१ नोव्हेंबर मंगळवारी आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसिलदारांसमोर एक मोर्चा काढायचा आहे आणि ११ डिसेंबरला महाराष्ट्रातला धनगरांचा नागपूरला विधानभवन घेरण्यासाठी अधिवेशन काळात जायचं आहे. हे अवाहन करतो… असेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

Leave a Comment